आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The District Government Will Take The Books Of The Library Literature,

जिल्ह्यातील साहित्यिकांचे ग्रंथ घेणार शासकीय ग्रंथालय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- जिल्ह्यातील लेखक, कवींच्या प्रत्येक पुस्तकाच्या दोन प्रती शासकीय ग्रंथालयात विकत घेतल्या जाणार आहेत. या उपक्रमामुळे शासकीय ग्रंथालय सर्वांना आपले वाटेल व या माध्यमातून वाचन संस्कृती विस्तारण्यास मदत होईल, अशी अपेक्षा जिल्हा ग्रंथ अधिकारी सुभाष मुंडे यांनी व्यक्त केली.

आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित कार्यक्रमात शासकीय ग्रंथालयास ग्रंथ प्रदान करण्यात आले. यावेळी मुंडे बोलत होते. ते म्हणाले, शासकीय ग्रंथालयात जिल्ह्यातील लेखक, कवी, समीक्षक, संशोधक यांची पुस्तके तेथे असावीत, अशी कल्पना कवी चंद्रकांत पालवे यांनी मांडली. ती स्वीकारून जिल्ह्यातील साहित्यिकांच्या पुस्तकाच्या दोन प्रती या ग्रंथालयासाठी विकत घेण्यात येतील. डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्या हस्ते मुंडे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर ग्रंथ प्रदान कार्यक्रम झाला. डॉ. सहस्रबुध्दे यांनी आनंदोत्सव उपक्रमाची माहिती दिली. नगरला जलसाहित्य संमेलन व्हावे, अशी अपेक्षा चंद्रशेखर करवंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

या कार्यक्रमास महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या जिल्हा प्रतिनिधी प्रा. मेधा काळे, डॉ. क्रांतिकला अनभुले, प्रा. डॉ. माहेश्वरी गावित, टी. एन. परदेशी, प्रा. डॉ. प्रतीक्षा गंगावणे, प्रा. डॉ. संगीता शेळके, प्रा. डॉ. राजू रिक्कल, प्रा. डॉ. मच्छिंद्र मालुंजकर, प्रा. भगत, ल. धों. खराडे, अशोकानंद महाराज कर्डिले, शब्बीर शेख, उषा सहस्रबुद्धे आदी उपस्थित होते. प्रारंभी दिवंगत कवी नामदेव ढसाळ आणि सपकाळे यांना र्शद्धांजली वाहण्यात आली.
जिल्हा वाचनालयातही स्वतंत्र विभाग हवा..

जिल्हा वाचनालयातही नगरशी संबंधित पुस्तकांचा विभाग असायला हवा. त्यामुळे वाचकांना आपल्या शहरातील साहित्यिकांची ओळख होऊन त्यांच्या पुस्तकांचा परिचय होईल. दुर्मिळ पुस्तकांच्या झेरोक्स प्रती ठेवल्यास अभ्यासूंना त्याचा फायदा होऊ शकेल.