आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेंग्यू रोखण्यासाठी जिल्हा हिवताप प्रशासन रस्त्यावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा हिवताप प्रशासनातर्फे १६ ते ३१ जुलै या कालावधीत डेंग्यू जनजागृती मोहिम राबवण्यात आली. या अंतर्गत नगर तालुक्यातील टाकळी खातगाव येथील हनुमान विद्यालयात कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी डेंग्यू मलेरिया आजारांबाबत घ्यावयाची काळजी, याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. साथीचे जीवघेणे आजार रोखण्याबाबत विद्यार्थ्यांना दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले, तसेच स्वच्छता राखण्याची शपथ देण्यात आली.
तापाने आजारी असलेल्या रुग्णांची माहिती देणे, कोरडा दिवस पाळणे, साठवलेले पाणी टाकून देणे, भंगार, कचऱ्याच्या ठिकाणी पाणी साचू देणे, पिण्याचे आणि सांडपाणी साठवताना काळजी घेणे अशा उपाययोजनांबाबत विद्यार्थ्यांना दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांसह उपस्थितांनी प्रतिज्ञा घेतली. प्रतिज्ञेचे वाचन पुरुषोत्तम आडेप यांनी केले. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना राबवण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला. चित्रफीत दाखवून उपस्थित विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले.

डेंग्यू आणि मलेरियाची साथ रोखण्यासाठी डासांची उत्पत्ती रोखणे महत्त्वाचे आहे. डेंग्यू रुग्णांवर उपचाराचा खर्च लाखापर्यंत असून वेळ कुटुंबाला होणारा त्रास दु:खदायक असतो. डासाची उत्पत्ती थांबवणे अवघड नाही, अशी माहिती या वेळी देण्यात आली. डॉ. आर. के. काकडे यांनी याविषयी मार्गदर्शन केले. साठवल्या जाणाऱ्या पाण्यात डासाची मादी ५०० अंडी देते. अंडी, अळी, कोश नंतर ते दिवसांत डास निर्माण होतो. ही माहिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी, ग्रामस्थांनी शिक्षकांनी काळजी घेतल्यास डेंग्यू, मलेरियामुक्त गाव निर्माण होईल, असेही डॉ. काकडे यांनी नमूद केले.

माणसाची रोग प्रतिकारशक्ती कमी असल्यास डेंग्यू, मलेरियासारख्या आजाराची लक्षणे लवकर दिसून येतात. त्यांनी रुग्णालयात उपचार घ्यावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले.
या कार्यक्रमाला जिल्हा सहायक अधिकारी रत्नाकर काकडे, खातगाव टाकळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. विश्वनाथ काकडे, सहायक अधिकारी जोहरी, आरोग्यसेवक दत्तात्रेय मुत्याल, अहिरवाडी, प्राचार्य एस. पी. कुलट, उपप्राचार्य भोर, पर्यवेक्षक सुभाष नरवडे आदी उपस्थित होते.

दरम्यान, नगर शहरातील काही भागात अजूनही डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढ‌ळून येत आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाने धूर कीटकनाशकांची फवारणी सुरू केली असली, तरी काही भागातच केली जात आहे. केडगाव उपनगरात नियमित पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिक पिण्याचे वापराचे पाणी साठवून ठेवतात. या स्वच्छ पाण्यात डासांची उत्पत्ती होऊ लागते. त्यामुळे केडगावला नियमितपणे पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी तेथील नागरिकांकडून होत आहे.

डेंग्यूला प्रतिबंध करण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा
जिल्ह्यात गतवर्षी डेंग्यूच्या आजाराची लक्षणे असलेले दोनशेहून अधिक रुग्ण होते. त्यातील रुग्णांचा मृत्यू झाला. यंदा मात्र डेंग्यू रुग्णांची संख्या घटली आहे. जुलैअखेर डेंग्यूचे अवघे रुग्ण आढळले आहेत. हे आजार रोखण्यासाठी शासनाच्या योजनांची माहिती घेऊन लोकांनीही त्यात सहभागी व्हावे. कारण प्रत्येकाचे आरोग्य चांगले राहील, हाच या मोहिमेचा उद्देश आहे. लोकांच्या सहभागामुळेच मोहीम यशस्वी होते.'' शामराव कांबळे, जिल्हा हिवताप अधिकारी, नगर.