आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Higher Education & Recurch Bill 2011 To Oppose In Ahmednagar

‘द हायर एज्युकेशन अँण्ड रिसर्च बिल 2011’ ला विरोध

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर: बार कॉन्सिल ऑफ इंडिया आणि बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र अँण्ड गोवा यांच्या अधिकारांवर गदा आणणार्‍या ‘द हायर एज्युकेशन अँण्ड रिसर्च बिल 2011’ ला विरोध करण्यासाठी नगर वकील संघातर्फे वतीने शुक्रवारी लालफिती लावून कामकाज करण्यात आले.
लिगल प्रोफेशनशी संबंधित निर्णय घेण्याचे अधिकार इंडिया आणि महाराष्ट्र बार कॉन्सिलला आहेत. या संघटनेने 14 नॅशनल लॉ स्कूल सुरू केली आहेत. एलएलबी, एलएलएमचे शिक्षण देण्याचा अधिकार संस्थेला आहे. याबाबतचे निर्णय लिगल एज्युकेशन कमिटी ऑफ कॉन्सिल घेत असते. ‘द हायर एज्युकेशन अँण्ड रिसर्च बील 2011’नुसार लिगल प्रोफेशनबाबतच्या शैक्षणिक धोरणाचा निर्णय घेण्याच्या बार कॉन्सिलचा अधिकार सरकार काढून घेणार असल्याची माहिती बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे अध्यक्ष अँड. अशोक पाटील यांनी दिली.
यावेळी नगर वकील संघाचे अध्यक्ष मंगेश दिवाणे, अँड. गोरक्ष तांदळे, अँड. सतीश गुगळे, अँड. विक्रम वाडेकर, अँड. अशितोष झिंजुर्डे, अँड. गणेश लेंडकर, अँड. एम. एम. खान, अँड. रफिक बेग यांच्यासह अनेक वकील उपस्थित होते.