आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाय-फायने कनेक्ट होणार निंबळक गाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- माहिती तंत्रज्ञानाच्या युगात एक पाऊल पुढे टाकत नगर तालुक्यातील निंबळक ग्रामपंचायतीने संपूर्ण गाव वाय-फाय इंटरनेटने कनेक्ट करण्याचा प्रकल्प पूर्णत्वास नेला आहे. वाय-फाय इंटरनेटने कनेक्ट असलेले हे महाराष्ट्रातील पहिले गाव ठरणार आहे.
जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प पूर्णत्वास जात आहे. येत्या १५ जून रोजी या प्रकल्पाचा प्रारंभ पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते होईल. एमआयडीसीमधील बायपासजवळ उभारलेल्या वाय-फाय इंटरनेट टॉवरचे काम नुकतेच पूर्ण झाले. यावेळी सरपंच विलास लामखडे, पंचायत समिती विस्तार अधिकारी खाडे, डेटा कॉम नेटवर्क ७१ चे प्रमुख दिलदार चौधरी यांच्यासह कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
डेटा कॉम नेटवर्क ७१ ही औरंगाबादची कंपनी वाय-फाय सेवा देणार असून, या सेवेचा लाभ एमआयडीसीतील उद्योजकांना, तसेच निंबळक इसळक येथील ग्रामस्थांनाही मिळणार आहे, अशी माहिती सरपंच लामखडे यांनी दिली. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी उद्योजकांच्या आमी संघटनेचे अध्यक्ष अशोक सोनवणे, एल अॅँड टी कंपनीचे सरव्यवस्थापक अरविंद पारगावकर, उद्योजक गोपाळकृष्णन, माधवराव लामखडे यांचे सहकार्य लाभले आहे.