आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेड्यांच्या विकासावरच देशाची प्रगती अवलंबून - अण्णा हजारे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारनेर- महात्मा गांधीजींनी देशवासीयांना संदेश दिला होता खेड्यांकडे चला. खेड्यांचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय देशाचा खऱ्या अर्थाने विकास होणार नाही. स्वातंत्र्याच्या ६६ वर्षांनंतरही खेड्यांचा विकास झाला. मात्र, सर्वांगीण विकास झाला नाही. हे नाकारता येत नाही, अशी खंत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली. पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी येथे नवनिर्वाचित सदस्यांचा पराभूत उमेदवार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
हजारे म्हणाले, आज अधिकांश खेड्यांचा विकास तो पक्ष आणि पार्ट्यांच्या गटबाजीमुळे थांबला असल्याचे स्पष्ट दिसते. राळेगणसिद्धीमध्ये गेली चाळीस वर्षे निवडणूक झालेली नसल्याने सर्वांगीण विकास झाला. पूर्वी दोन वेळा निवडणूक झाल्या, परंतु त्या एक दुसऱ्याच्या सलोख्याने झाल्या. आम्ही लोकशाहीचा स्वीकार केला आहे, तर निवडणूक करणे गैर काय? असा विचार करून या वर्षी निवडणुका करण्याचा निर्णय झाला. त्यासाठी दोन पॅनेल तयार झाले. आम्ही सर्वांना सांगितले की एक दुसऱ्यांशी भांडण-तंटा करता खेळीमेळीच्या वातावरणात निवडणुका करा. मतदारांकडून मत मिळवण्यासाठी सरळ मार्गाने प्रचार करा. कारण आपण लोकशाहीचा स्वीकार केला आहे.
माझे कुणावरही नैतिक दडपण येऊ नये म्हणून मी प्रचारकाळात १२ दिवस बाहेर जाणार आहे. तुम्हाला खेळीमेळीच्या वातावरणात प्रचार करता यावा, असा उद्देश होता. १२ दिवसांनंतर मी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ठरवल्याप्रमाणे दुपारी वाजता राळेगणसिद्धीमध्ये पोहोचलो असता कुठेही भांडण-तंटा मतभेद करता प्रत्येकाने राळेगणसिद्धी परिवार शब्दाला साजेशे वर्तन ठेवले म्हणून त्यांना धन्यवाद दिले. दोन्हीही पॅनेलच्या कार्यकर्त्यांना सांगितले की मागील काळात बिनविरोध निवडणुका करून तुम्ही जो आदर्श घालून दिला. आता निवडणुकीचे निकाल आल्यानंतर पडलेल्या पॅनेलने निवडून आलेल्या पॅनेलचा शॉल, श्रीफळ देऊन सन्मान करावा सर्वांनी गावच्या विकासाला लागावे. महाराष्ट्रातील ज्या गावात निवडणुका झाल्या, त्यापैकी अनेक गावांत याचे अनुकरण झाले, तर महाराष्ट्रातील खेड्यांच्या विकासाला अधिक गती मिळू शकेल. दोन्हीही पॅनेलने ते मान्य केले. त्याप्रमाणे शुक्रवारी हा सत्काराचा कार्यक्रम करण्यात आल्याचे हजारे यांनी स्पष्ट केले.
आज अनेक गावांत निवडणुका होतात. एक पॅनेल निवडून येतो. मात्र, पराभूत पॅनेल असा विचार करतो की, यांनी आम्हाला पाडले. मग आता हे काम कसे करतात आम्ही पाहतो. चांगली कामे होऊ देत नाहीत. त्यामुळे विकास कामांना खीळ बसते. त्यामुळे खेड्यांचे अतोनात नुकसान होते येणाऱ्या नवीन पिढ्यांनाही वेगळे वळण लागते. गावात मतभेद, मनभेद वाढत जातात. त्यातून भांडण, तंटे निर्माण होतात पैसा, वेळ वाया जातो. निवडणुका झालेल्या गावांमध्ये आम्ही लोकशाही मानलेली असल्याने जनतेने दिलेला कौल मान्य करून पराभूत पॅनेलने निवडून आलेल्या पॅनेलचा शॉल, श्रीफळ देऊन सन्मान केला, तर खेड्यांच्या विकासाला अधिक गती मिळू शकेल, असे हजारे यांनी सांगितले.
पराभव मान्य करून विकास कामे करावी
मी कार्यकर्त्यांना नेहमी सांगत आलो आहे की, कार्यकर्त्यांचे शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक जीवन, त्याग आणि अपमान पचवण्याची शक्ती हे गुण असावे लागतात. असा कार्यकर्ता समाजाचे आणि राज्याचे, देशाचे मोठे कार्य करू शकतो. निवडणुकीत झालेला पराभव मान्य करून तो अपमान समजता सर्वांंनी मिळून विकास कामे करणे आवश्यक आहे, असेही अण्णा हजारे यांनी यावेळी सांगितले.
पराभूतांनी केला विजयी उमेदवारांचा सत्कार
राळेगण सिद्धी परिवाराने ग्रामपंचायत निवडणुकीनंतर विजयी पराभूत उमेदवारांच्या मनोमिलनाचा एक दिशादर्शक कार्यक्रम घेतला. निवडणुकीत पराभूत उमेदवारांनी विजयी उमेदवारांचे सत्कार केले. यावेळी पराभूत पॅनेल प्रमुख जयसिंग मापारी यांनी विजेते पॅनेल प्रमुख लाभेश औटी यांचाही सत्कार केला. सर्व नवनिर्वाचित उमेदवारांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आशीर्वाद देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.