आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूचा ट्रक पकडल्याने तस्करांचा पथकावर हल्ला, चौघांंविरोधात गुन्हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर- वाळूचा ट्रक पकडणाऱ्या महसूल पथकावर वाळूतस्करांनी हल्ला केला. ही घटना गुरुवारी तालुक्यातील खांबे शिवारात घडली. वाळूतस्करांनी वाळूने भरलेला ट्रक पळवून नेला. पथकाने रात्री आश्वी पोलिस ठाण्यात चौघांंविरोधात गुन्हा दाखल केला. 
 
मुळा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक होत असल्याची मािहती मिळताच तहसीलदारांनी नियुक्त केलेल्या पथकाने खांबे शिवारात वाळू घेऊन चाललेला एक ट्रक पकडला. ट्रकचालक मंगेश शेंडगे याच्याकडे चौकशी केली असता विनापरवाना ही वाळू वाहतूक होत असल्याचे समजले. पथकाने हा ट्रक पोलिस ठाण्यात आणण्याचा प्रयत्न केला. वाळूने भरलेला ट्रक पोलिस ठाण्यात नेत असताना चालक शंेडगे यांना ट्रक आश्वीच्या दिशेने नेता खांबे गावच्या दिशेने नेला. पथकाने ट्रकचा पाठलाग सुरु केल्यानंतर चालकाने ट्रक जंगलात उभा करत त्याची चावी काढून घेत तो नादुरुस्त करत तेथून पलायन केले. 
 
बुधवारी घडलेल्या या घटनेनंतर गुरुवारी नादुरुस्त करण्यात आलेला वाळूने भरलेला ट्रक मेकॅनिककडून दुरुस्त करत आश्वी पोलिस ठाण्यात आणत असताना तेथे आलेल्या चालक मंगेश धोंडिबा शेंडगे (रा. साकूर), बाळू पोंधे (रा. खांबा), रावसाहेब लहानू खेमनर (साकूर) आणि अनिल भांडकोळी (राहुरी) या चौघांंनी पथकाच्या ताब्यातील हा ट्रक रस्त्यात अडवला. पथकातील अधिकाऱ्यांनी विचारणा केली असता शेंडगे याने हातात लोखंडी गज घेत वाहनाला आडवे होत त्यांना दमबाजी करत झटापट केली. ट्रक पोलिस ठाण्यात नेऊ देणार नसल्याचे सांगत त्याने कामगार तलाठी रामदास मुळे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. पथकातील अन्य कर्मचारी मुळे यांना वाचवण्यास पुढे आले असता आरोपीने आत्महत्या करण्याची आणि ट्रक पेटवून देण्याची धमकी देत अधिकाऱ्यांची नावे घेईन असे धमकावत ट्रक पळवून नेला. 
 
तलाठी मुळे यांनी आश्वी पोलिस ठाण्यात चौघांविरोधात शासकीय कामात अडथळा आणत ट्रक पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान, या प्रकारामुळे महसूल खात्याचे कर्मचारी हादरले असून वाळूतस्करांवर कारवाई करण्यासाठी धजावत नाहीत. संगमनेर तालुक्यात सुरु असलेल्या या वाळूतस्करीला महसूलच्याच एका अधिकाऱ्याचे आशीर्वाद असल्याने वाळूतस्करांची दादागिरी वाढली असून आता ते कारवाईसाठी आलेल्या पथकावर हल्ले करू लागले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी वेळीच या प्रकाराची दखल घेऊन संबधित महसूल अधिकाऱ्याची येथून उचलबांगडी करावी, अशी मागणी जोर धरत आहे. 
बातम्या आणखी आहेत...