आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एचआयव्हीमुळे मृत्यूचे भय आता दूर...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - एचआयव्ही,एड्स आता असाध्य राहिलेला नाही. वेळीच निदान झाले आणि योग्य उपचार घेतले, तर एचआयव्हीमुळे कोणाचा मृत्यू होणार नाही, अशी स्थिती आज आहे, असे पुण्यातील प्रयास संस्थेचे अध्यक्ष डॉ. विनय कुलकर्णी यांनी सांगितले.
एड्सग्रस्त, तसेच आर्थिक परिस्थितीमुळे उपचारांपासून वंचित राहणाऱ्यांसाठी सुसज्ज केअरिंग फ्रेंडस हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे भूमिपूजन सोमवारी स्नेहालय पुनर्वसन संकुलात झाले. यावेळी ते बोलत होते. सिजेंटा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश आपटे, क्रॉम्प्टन ग्रीव्हजचे मुख्य व्यवस्थापक सजल मुखर्जी, जोसेफ प्रेमराज, "आमी' संघटनेचे अशोक सोनवणे, डॉ. मार्सिया वॉरन, दत्तात्रेय कोतकर आदी यावेळी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी अरुण सेठ होते. एड््सची भीती कमी झाली, तरीही भारतात आजही एड्सग्रस्तांशी अमानवी व्यवहार केला जातो. त्यांना वैद्यकीय उपचार देताना, नोकरी देताना, सामायिक वापराच्या सुविधा, तसेच सार्वजनिक कार्यालयात भेदभाव घृणेचा अनुभव येतो. एड्सच्या प्रसाराला प्रभावी प्रतिबंध होत असला, तरी भारतातील परिस्थितीमुळे पुढील किमान दोन दशके एचआयव्ही इतर गुप्तरोगांच्या निर्मूलनासाठी जिद्द चिकाटीने प्रयत्न करण्याची गरज आहे, असे डॉ. विनय कुलकर्णी म्हणाले.

रुग्णालयाचे संचालक डॉ. सुहास घुले म्हणाले, राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेने २०१३ मध्ये एड्सग्रस्तांना वैद्यकीय सेवा देणाऱ्या समुदाय काळजी केंद्रांची मदत थांबवली. एड्सग्रस्तांची परवड लक्षात घेऊन देशात केवळ स्नेहालयानेच लोकसहभागातून रुग्णसेवा पूर्ववत सुरु ठेवली.
"स्नेहदीप'मुळे नवजीवन मिळालेल्या महिलेने यावेळी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश परजणे, समन्वयक प्रवीण मुत्याल, विष्णू कांबळे, अजित कुलकर्णी, हनिफ शेख, अनिल गावडे आदी प्रयत्नशील होते.