आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात आढळली ४६४ शाळाबाह्य मुले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्याच्या मोहिमेत कधीही शाळेत गेलेल्या ते १४ वयोगटातील ४६४ विद्यार्थ्यांचा शोध शासनाला लागला. ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी शाळेत प्रवेश घेतला, पण ते कायम गैरहजर आहेत, अशा ६६४ विद्यार्थ्यांचाही शोध घेण्यात आला. या विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे शिक्षण समितीचे सभापती तथा उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी सांगितले.

राज्यभरात शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल करण्याची मोहीम राबवली जात आहे. जिल्हा परिषद स्तरावर सुमारे १४ हजार कर्मचाऱ्यांच्या मदतीने घरोघर जाऊन शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्याचे नियोजन आखण्यात आले. वीटभट्टी कामगार, ऊसतोडणी कामगार आदी कारणास्तव स्थलांतरित झालेल्या कुटुंबांतील ते १४ वर्षांतील बालकांचा शोध घेण्यात आला.
शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या बोटाला शाई लावण्यात आली. शाई नसलेल्या मुलांना शाळाबाह्य समजण्यात आले. या मोहिमेत एकदाही शाळेत गेलेली ४६४ मुले शोधण्यात आली. अकोले १९, संगमनेर ३७, कोपरगाव २४, राहाता ९८, श्रीरामपूर ९, राहुरी ३४, नेवासे ८५, शेवगाव १३, पाथर्डी ७२, जामखेड ७, कर्जत १५, श्रीगोंदे १९, पारनेर तर नगरमध्ये १७ मुले कधीच शाळेत गेलेले आढळून आले.

११६ विद्यार्थ्यांचे वर्षभरात निधन
प्राथमिकशाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या सुमारे ११६ विद्यार्थ्यांचे वर्षभरात अपघाती निधन झाले. बहुतांश विद्यार्थ्यांचा विहिरीत पडून, नदीत बुडून आदी कारणांनी मृत्यू झाला. संबंधित विद्यार्थ्यांपैकी २८ विद्यार्थ्यांना विमा योजनेचा लाभ देण्यात आला. उर्वरित ८८ विद्यार्थ्यांनाही लवकरच लाभ देण्यात येणार असल्याचेही उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी सांगितले.