आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Theater Give Me Good Face And Identity Said Siddharth Jadhav

रंगभूमीने मला चेहरा मिळवून दिला - नाट्य-चित्रपट अभिनेता सिद्धार्थ जाधवचे प्रतिपादन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - आजमी जरी चित्रपटांमधून काम करत असलो, तरी हा चेहरा मला रंगभूमीमुळेच मिळाला. सुरुवातीला चेहऱ्याअभावी अनेक ठिकाणी नाकारले जायचे, परंतु रंगभूमीने वेळोवेळी बळ दिले अशा शब्दांत अभिनेता सिद्धार्थ जाधवने बुधवारी आपल्या भावना व्यक्त केल्या.

अहमदनगर महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या उद‌्घाटनप्रसंगी सिद्धार्थ बोलत होता. माउली संकुलातील नव्या नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमास महापौर तथा आमदार संग्राम जगताप, दिग्दर्शक केदार शिंदे, परीक्षक राजन ताम्हणे, सुनील बर्वे, दिग्दर्शक सुजय डहाके, नरेंद्र फिरोदिया, स्वप्निल मुनोत, अमोल खोले, हर्षल बोरा, विक्रम फिरोदिया आदी उपस्थित होते.

सिद्धार्थ म्हणाला, मी नगरमध्ये माझ्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नव्हे, तर एक रंगकर्मी म्हणून आलो आहे. रंगभूमीवरील अनेक कलाकारांनी जगाचा पडदा गाजवला. नगर जिल्ह्याला तर मोठा सांस्कृतिक वारसा आहे. दोन दिवस मी शहरातील विविध शाळा, महाविद्यालये, संस्थांना भेटी दिल्या. मला प्रत्येक ठिकाणी कलाकार भेटले. या कलाकारांना वाव देण्याचे काम केले पाहिजे. पिकतं तिथं विकलं जात नाही, अशी जुनी म्हण आहे. ती खरी आहे. प्रसारमाध्यमांनी येथील कलाकारांना वाव दिला, तर या म्हणीप्रमाणे येथील सोनं (कलावंत) नक्कीच बाहेर विकलं जाईल.

आमदार जगताप म्हणाले, महापालिकेच्या नाट्यगृहाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. लवकरच तो सुटेल.