नगर - सोमवारीरात्री मार्केटयार्ड परसिरात
सॅमसंग कंपनीच्या
मोबाइल शोरुममध्ये चौघा जणांनी चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये लक्षात आले आहे. या फुटेजवरून पोलिसांनी चोरट्यांची रेखाचित्रे जारी केली आहेत.
मार्केटयार्ड परसिरातील मुंजोबा स्वीटशेजारी असलेल्या परफेक्ट मोबाइल शॉपीमध्ये सोमवारी रात्री आठ ते मंगळवारी पहाटेच्या दरम्यान चोरी झाली होती. यामध्ये लाख ८८ हजार रुपये किमतीचे मोबाइल चोरट्यांनी चोरून नेले होते. याप्रकरणी शोरुमचे मालक धीरज शविदास डागा यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी शाेरुममध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चित्रण तपासले. झोपण्यासाठी आल्याचे सोंग घेऊन चोरट्यांनी शोरुमचे कुलूप तोडून चोरी केल्याचे स्पष्ट झाले होते.
या फुटेजमध्ये चोरट्यांची छायाचित्रे स्पष्ट दिसत आहेत. सीसीटीव्हीमधील चित्रणानुसार दुकानात जाऊन मोबाइल चोरणाऱ्या आरोपीने राखाडी रंगाची ट्रॅकपँट, गोल गळ्याचा टी शर्ट, फिक्कट रंगाचा पेापटी रंगाचा टी शर्ट असा पेहराव परिधान केलेला होता.
बाहेर उभा असलेला दुसरा आरोपी शरीरयष्टीने मजबूत असून त्याने पांढऱ्या रंगाचा हाफ टी शर्ट घातलेला आहे. तसिरा आरोपी बर्मुडा पँट हाफ शर्टवर आहे. दोघांकडे सॅक असून सर्वांचे वय २५ ते २८ दरम्यान आहे. यामधील आरोपींबाबत कोणाला काही माहिती असल्यास कोतवाली पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक यादवराव पाटील यांनी केले आहे.
झोपेचे सोंग
झोपण्यासाठी आल्याचे सोंग घेऊन चोरट्यांनी शोरुमचे कुलूप तोडून चोरी केल्याचे स्पष्ट झाले. हे सर्व आरोपी २५ ते २८ वयाचे आहेत.