आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Theft Issue At Haraeshwar Mandir At Nagar, Divya Marathi

कर्जुलेहऱ्या येथील मंदिरात पुन्हा चोरी; वर्षभरातील पाचवी घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर- कर्जुलेहऱ्या येथील हरेश्वर मंदिरातून शनिवारीरी चोरट्यांनी तीनशे रुपये लांबवले. चोरीस गेलेली रक्कम किरकोळ असली, तरी गेल्या वर्षभरात झालेली ही चोरीची पाचवी घटना आहे. याबद्दल ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. चाेरट्यांनी मुख्य प्रवेशदारचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
दानपेटीतील रक्कम वशि्वस्तांनी शुक्रवारी (२२ ऑगस्ट) काढून घेतल्याने चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नाही. दरम्यान, दर्याबाई पाडळी येथील दर्याबाई देवीच्या मंदिराचे कुलूप तोडूनही चोरीचा प्रयत्न झाला, परंतु तेथेही चोरट्यांच्या हाती काही लागले नाही.