आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरमधील लालटाकी परिसरात पावणेआठ लाखांची चोरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - लालटाकी परिसरातील बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी पावणेआठ कोटी रुपयांचा ऐवज लांबवला. 2 फेब्रुवारीला सकाळी दहा ते दुपारी साडेतीनच्या दरम्यान ही चोरी झाली. योगेश मदनलाल मालपाणी (निर्मल चेंबर्स, लालटाकी) हे बाहेर गेल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांचे घर फोडून सोन्याचे दागिने, कॅमेरा व रोकड असा पावणेआठ लाखांचा ऐवज लांबवला. दुसर्‍या घटनेत कोठला परिसरातील घासगल्ली येथील फिरोज जिंदार खान यांचे घर फोडून चोरट्यांनी 27 हजारांची रोकड लांबवली. 2 फेब्रुवारीला दुपारी ही घटना उघडकीस आली.