आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुळा धरणाच्या पाण्यात उतरून दीड लाखांच्या साहित्याची चोरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुरी शहर - मुळा धरणाच्या पाण्यात उतरून मासे पकडण्याच्या अवजड जाळ्या, प्लास्टिक ड्रम इतर साहित्य हा लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी गेल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 
 
मुळा धरणाच्या नगर एमआयडीसी पंम्पिग स्टेशनपासून एक किलोमीटर अंतरावर पश्चिमेस असलेल्या पाण्यात २५ ऑक्टोबरच्या मध्यरात्री चोरीची ही घटना घडली. दरम्यानच्या कालावधीत मुळा धरणातील मच्छिमारीचा ठेका असलेल्या अभिनव विकास संस्था वरवंडी यांच्या मालकीचे साहित्य चोरीस गेले आहे. या चोरीत लाख रूपये किंमतीचे गरवारे कंपनीचे नायलाॅन जाळे, पाण्यावर जाळे तरंगण्यासाठी वापरलेले ४० हजार रूपये किमतीचे ८० प्लास्टिकचे ड्रम,५ हजार रुपयांचे लोखंडी हुक या सामानाचा समावेश आहे. 
 
मच्छिमारीसाठी वापरात येणारे हे साहित्य धरणाच्या पाण्यात सोडण्यात आलेले होते. चोरट्यांनी पूर्ण क्षमतेने भरलेल्या धरणाच्या पाण्यात उतरून हे साहित्य चोरून नेले. या प्रकरणी अभिनव मच्छिमारी विकास संस्थेचे सचिव किशोर भागडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुळा धरण पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना लुटणे तसेच चोरीच्या अनेक घटना परिसरात घडल्या आहेत. मात्र धरणाच्या पाण्यात मच्छीमारीसाठी वापर होणारे अवजड जाळे इतर साहित्याची चोरी प्रथमच घडल्याने मुळा धरणाच्या सुरक्षिततेचा सवाल ऐरणीवर आला आहे. 
 
पोलिसांपुढे आव्हान 
२६हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेले मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असताना धरणाच्या पाण्यात उतरून झालेली धाडसी चोरी हे राहुरीच्या पोलिस प्रशासनाला आव्हान ठरले आहे. 
बातम्या आणखी आहेत...