आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आश्वी परिसरात भुरट्या चोरट्यांचा धुमाकूळ, नागरीक त्रस्‍त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर- तालुक्यातील आश्वी व परिसरात भुरट्या चोरट्यांनी बुधवारी (18 जून) रात्री धुमाकूळ घातला. गजबजलेल्या वस्तीत त्यांनी घरफोड्या करत मोठ्या प्रमाणात ऐवज लंपास केला. एकीकडे मध्यरात्री पोलिस चोरांचा शोध घेत असताना चोर दुस-या ठिकाणी घरफोड्या करण्यात व्यग्र होते. चार ठिकाणी झालेल्या चो-यांत जवळपास सव्वा लाखाची रोकड, 250 ग्रॅम चांदीच्या मूर्ती व 12 तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले. आश्वी खुर्द परिसरातील कोंबडवाडीत निवृत्ती सोसे यांच्या खिशातून घराच्या चाव्या काढत स्वयंपाक घरातील लोखंडी पेटीतून एक लाखाची रोकड आणि कागदपत्रे घेऊन चोरट्यांनी पळ काढला. त्यांनी रंजना सोसे आणि त्यांच्या 14 वर्षांच्या मुलास काठीचा धाक दाखवला.
चोरीची माहिती मिळताच पोलिस सोसे यांच्या वस्तीवर पोहोचत नाही, तोच चोरट्यांनी शिक्षक सुभाष मोरे यांच्या बंगल्याचे कुलूप तोडून प्रवेश केला. घरात झोपलेल्या कुटुंबीयांवर त्यांनी गुंगीचे औषध फवारत दोन तोळे सोन्याचे दागिने व सात हजारांची रोकड नेली. चोरट्यांनी त्यानंतर बनेमिया सय्यद यांच्या घराकडे मोर्चा वळवला. चोरट्यांचा अंदाज येताच मन्सूर सय्यद जिना उतरून येत असताना चोरट्यांनी त्यांना वीट फेकून मारत पळ काढला.
यशवंतनगरमधील डॉ. वसंत माने यांच्या बंगल्याचे कुलूप तोडून चार तोळे सोन्याचे दागिने, 250 ग्रॅम वजनाची लक्ष्मीची मूर्ती व रोकड घेऊन पोबारा केला. त्यानंतर वृत्तपत्र विक्रेते रमेश कु-हाडे यांच्या बंगल्यात प्रवेश करून दोन हजारांची रोकड नेली. कु-हाडे यांच्या वडिलांनी चोरांना हटकले असता त्यांना मारहाण करत तेथून चोरट्यांनी पळ काढला.