आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाथर्डी तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ,

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी - गेल्या दोन दिवसांपासून शहर तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घालून दहशत निर्माण केली आहे. तालुक्यातील मोहोजखुर्द, कासारवाडी येथे चाेरट्यांनी मारहाण करत सोने-चांदीचे दागिने रोख रक्कम लुटून नेली. घटनास्थळी पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी भेट देऊन तपासाचे आदेश दिले.

शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास मोहोजखुर्द येथील जगन्नाथ मोहन ठाेकळ यांना घराबाहेर चार जण दिसले. चोरांनी त्यांना पकडून चाकूचा धाक दाखवत ते तेथेच थांबले. त्यानंतर उर्वरित ४-५ जण ठोकळ यांच्या घरात शिरून चाकूचा धाक दाखवत महिलांच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने, मोबाइल असा सुमारे २८ हजारांचा ऐवज चोरून नेला.

पिण्यासाठी पाणी मागण्याचा बहाणा करून चोरट्यांनी दार उघडावयास लावले. ठोकळ यांची पत्नी संगीता, मुलगी कोमल सीमा नावाची पाहुणी अशा तिघी घरात होत्या. चाेरट्यांनी ठोकळ यांच्या पत्नीला मारहाण करत दहशत निर्माण केली. नंतर चोरांनी कासारवाडी येथे मोर्चा वळवत काशिनाथ आव्हाड ताजमहंमद शेख यांना मारहाण करत रोख रक्कम दागिने चोरून चोरून नेल्याचे ठोकळ यांनी फिर्यादीत म्हटले आहे. एकाच रात्री तालुक्यात तीन ठिकाणी चोरी झाली. तोंडे बांधलेली २० ते ३० वयोगटातील चोरांच्या टोळीचा तपास लावणे पोलिसांना आव्हान ठरले आहे.