आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर्जुलेहर्यातील हरेश्‍वर मंदिरात चोरी, गावक-यांचा बंद ठेवून निषेध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर - तालुक्यातील कर्जुलेहर्या येथील हरेश्वर मंदिरातील विठ्ठल-रुख्मिणी व श्रीकृष्णाच्या मूर्तीवरील चांदीचे मुकुट चोरीस गेले. रविवारी उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद झालेली नव्हती. या मुकुटांची किंमत एक लाख रुपये असल्याचे समजते. चोरीच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी रविवारी कडकडीत बंद पाळला.

नगर-कल्याण महामार्गालगत कर्जुलेहर्या येथे ग्रामदैवत हरेश्वराचे पुरातन मंदिर आहे. गाभार्‍यात विठ्ठल-रुख्मिणी व र्शीकृष्णाच्या मूर्ती आहेत. मुकुट चोरीस गेल्याचे रविवारी सकाळी पुजारी बाळासाहेब रंगनाथ महामुनी यांच्या लक्षात आले. पोलिस निरीक्षक सुनील शिवरकर यांनी नगरहून श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. मात्र, श्वानपथकाला चोरट्यांचा माग लागला नाही.

कुलूप सुरक्षित असूनही चोरी झाल्याने पोलिसांनी गावातच कसून चौकशी केली. एका महिलेने शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास मूर्तीवर मुकुट नव्हता, असे सांगितले. नागपंचमीनिमित्त साफसफाईसाठी पुजार्‍याने मुकुट काढले असावेत, असा समज झाल्याने वाच्यता केली नव्हती, असे तिने सांगितले होते.