आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदुकीची धाक दाखवून राहुरीत 4.5 लाखांचा ऐवज चोट्यांनी पळवला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुरी - घरात एकट्या असलेल्या महिलेला बंदुकीचा धाक दाखवून पाच दरोडेखोरांनी 4 लाख 53 हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना महात्मा फुले कृषी विद्यापीठ कर्मचारी वसाहतीत सोमवारी पहाटे 2:30 वाजता घडली.

दरोडेखोरांनी विद्यापीठाच्या अरविंद वसाहतीत राहणार्‍या राजेंद्र सदाशिव वाघ (बॉटनी डिपार्टमेंट) यांच्या घराच्या मागील दरवाजाला असलेली जाळी व कडी तोडून आत प्रवेश केला. वाघ रविवारी कामानिमित्त पुण्याला गेले असल्याने त्यांची पत्नी लता एकट्याच घरी होत्या. त्यांना बंदुकीचा धाक दाखवून 15 तोळे सोने व 1 लाख 25 हजार रुपयांची रोकड असा सुमारे 4 लाख 53 हजारांचा ऐवज दरोडेखोरांनी लांबवला. त्यांच्या हातातील दोन सोन्याच्या अंगठय़ा व कपाटातील सोन्याचे दागिने घेऊन दरोडेखोरांनी पोबारा केला. दोन मोबाइलही दरोडेखोरांनी लंपास केले. त्यामुळे पोलिस व पतीशी संपर्क कसा साधायचा असा प्रश्न लता यांना पडला. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील रहिवासी जमा झाले. तासाभरानंतर सुरक्षा कर्मचारी आले. सकाळी नगर येथून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. श्वानाने रस्त्यापर्यंत माग दाखवला; परंतु त्याचा उपयोग झाला नाही. दुपारी र्शीरामपूर उपविभागाचे उपअधीक्षक अंबादास गांगर्डे, पोलिस निरीक्षक अशोक राजपूत यांनी घटनास्थळाची पाहणी केली.