आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डीत ‘थीम पार्क’; केंद्र प्रयत्न करणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी - देशविदेशातून येणा-या भाविकांची संख्या लक्षात घेता शिर्डीत दिल्लीच्या धर्तीवर किंगडम थीम पार्क उभारणे गरजेचे आहे. केंद्र सरकारचे पर्यटन खाते त्यासाठी प्रयत्न करील, अशी ग्वाही केंद्रीय पर्यटनमंत्री सुबोधकांत सहाय यांनी रविवारी दिली.
साईदर्शनानंतर ते म्हणाले की, साईबाबांचा जीवनपट उलगडणारा लाइफ शो पार्क शिर्डीत उभारण्यासाठी राज्य सरकार व संस्थानशी आम्ही चर्चा करत आहोत. पर्यटनाच्या योजनांविषयी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशीही चर्चा करणार आहोत. विमानतळ लवकर झाल्यास विदेशी पर्यटक येथे येऊ लागतील.
सध्या भारतात 50 लाख पर्यटक येतात. आगामी काळात दरवर्षी अडीच ते तीन कोटी पर्यटक येण्यासाठी केंद्राने योजना हाती घेतल्या आहेत. देशात 26 लाख बजेट हॉटेल व प्रत्येक वर्गासाठी 2 लाख हॉटेल उभारण्यासाठी पर्यटन खाते प्रयत्नशील आहे. दरवर्षी 4 कोटी पर्यटक आल्यास 1 कोटी रोजगार उपलब्ध होईल. नाशिक येथील कुंभमेळ्याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याचेही सहाय यांनी या वेळी सांगितले.