आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाळू लिलावाची प्रक्रिया अखेर गुंडाळली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- तब्बल आठ वेळा लिलाव घेऊनदेखील प्रतिसाद न मिळाल्याने प्रशासनाने अखेर वाळू लिलावाची प्रक्रिया गुंडाळली. आता थेट पुढच्या वर्षी मार्च महिन्यात ही प्रक्रिया पुन्हा सुरू होईल. वाळूच्या लिलावास कमी प्रतिसाद मिळाल्यामुळे जिल्ह्याच्या महसुली उत्पन्नात घट होण्याची चिन्हे आहेत.
नगर जिल्ह्यातील नेवासे, पारनेर, श्रीगोंदे, संगमनेर, अकोले, कर्जत, जामखेड, श्रीरामपूर, राहुरी, पाथर्डी शेवगाव या तालुक्यांमधील मुळा, प्रवरा, गोदावरी, भीमा सिना या नदीपात्रांमध्ये प्रशासनाचे अधिकृत १७९ वाळूसाठे आहेत. या वाळूसाठ्यांच्या लिलावातून प्रशासनाला दरवर्षी कोट्यवधींचा महसूल मिळतो. या वाळूसाठ्यांच्या विक्रीसाठी प्रशासनाने आतापर्यंत तब्बल आठ वेळा लिलाव घेतले. १७९ साठ्यांपैकी केवळ २५ साठ्यांचे ऑनलाइन लिलाव झाले आहेत. उर्वरित १५३ वाळूसाठ्यांचे लिलाव होणे बाकी आहे. या वाळूसाठ्यांच्या लिलावामधून प्रशासनाला दहा ते पंधरा कोटींचा महसूल मिळेल, असा अंदाज होता. मात्र, केवळ २५ वाळूसाठ्यांचे लिलाव झाल्याने प्रशासनाला केवळ कोटी ७६ लाखांचा महसूल मिळाला आहे.
दोन महिन्यांपूर्वी मुळा, प्रवरा, गोदावरी, भीमा सिना या नद्यांमध्ये महसूल पोलिस प्रशासनाने संयुक्तपणे अनधिकृतपणे वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली. वाहने पकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. मात्र, सध्या ही कारवाई थंडावली आहे. लिलाव झाल्याने जिल्ह्यात चोरट्या मार्गाने वाळू उपसा सुरुच आहे. गौण खनिज विभागाने एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ अखेर ४८५ जणांवर दंडात्मक कारवाई करुन ७० कोटी ९८ लाख ६०६ रुपयांचा दंड ठोठावला. यापैकी केवळ कोटी २२ लाख ७७ लाख १९६ रुपये वसूल करण्यात प्रशासनाला यश आले आहे. अजूनही ६९ कोटी ३५ लाख ७० हजार ३८७ वसूल होणे बाकी आहे. अनधिकृत वाळू उपशावर कारवाई केल्यामुळे सर्व वाळूसाठ्यांचे लिलाव होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली आहे. २७ मे रोजी झालेल्या वाळू लिलावातून केवळ साठ्यांची विक्री झाली आहे. वाळू व्यावसायिकांनी पाठ फिरवल्याने प्रशासनाला लिलाव गुंडाळावे लागले.
दरम्यान, पोलिस महसूल प्रशासन पुन्हा जिल्ह्यातील अनधिकृत वाळू उपशाविरोधात कारवाई हातात घेणार आहे. तहसीलदार जिल्हास्तरावर प्रशासनाने पथकांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे लवकरच कारवाईला वेग येण्याची शक्यता आहे. वाळू तस्करांवर कारवाईची नागरिकांचीही मागणी आहे.
पावसाळ्यामुळे आता वाळूचे लिलाव बंद
- आतापर्यंत आठ वेळा ऑनलाइन लिलावाची प्रक्रिया घेण्यात आली. जिल्ह्यातील १७९ वाळूसाठ्यांपैकी २५ साठ्यांचे लिलाव झाले आहेत. त्यातून कोटी ७६ लाख प्रशासनाला मिळाले. पावसाळा सुरू झाल्याने लिलावाची प्रक्रिया बंद करण्यात आली आहे.''
आर. एच. ब्राह्मणे, गौण खनिज अधिकारी, नगर.
एप्रिल महिन्यात ३५ लाख ८३ हजारांचा दंड
एप्रिलमध्ये महसूल विभागाने वाळूची ९५ वाहने पकडली. पोलिसांनी आरटीआेने केसेस करून ३५ लाख ८३ हजारांचा दंड वसूल केला. अन्य गौण खनिजाची वाहतूक करणारी १५ वाहने पकडून केसेस करून लाख २३ हजार दंडाची वसुली केली. सर्वाधिक २९ कारवाया कोपरगावमध्ये करण्यात आल्या.