आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलनाआधी आण्णा हजारेंच्या देशभरात 35 सभा होणार, गुजरात निवडणुकीनंतर सुरूवात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निघोज- बहुचर्चित लोकपाल कायद्याच्या अंमलबजावणीसाठी दिल्लीत पुकारण्यात आलेल्या आंदोलनाची पूर्वतयारी म्हणून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या देशभरात ३० ते ३५ सभा होणार आहेत. त्यातील सोळा सभांचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. गुजरात निवडणुका झाल्यानंतर हजारे यांचे दौरे सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. 

फेब्रुवारी २०१८ च्या शेवटच्या आठवड्यात दिल्लीत आंदोलन करण्याची घोषणा हजारे यांनी केली आहे. आंदोलनापूर्वी देशभरात दौरे करून सभा घेण्याचे आणि त्यातून लोकजागृती करून आंदोलनातील सहभाग वाढवण्याचे नियोजन आहे. त्यासाठी राळेगणसिद्धी येथे सोशल मीडिया सेलही कार्यरत करण्यात आला आहे. आतापर्यंत १६ ठिकाणांहून अण्णांना सभेसाठी निमंत्रण आले आहे. अरुणाचल प्रदेश, ओरिसा, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांचा यामध्ये समावेश आहे. महाराष्ट्रात मात्र अद्याप सभेचे नियोजन झालेले नाही. हजारे स्वतः व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून विविध राज्यांतील बैठकांमध्ये सहभागी होत आहेत. २० नोव्हेंबरला राळेगणसिद्धीमध्ये आढावा बैठक घेण्याचे नियोजन आहे. प्रचार साहित्य, सभांचे ठिकाण ठरवणे, सरकारी विभागांच्या परवानग्या अशी कामे सुरू आहेत. 
बातम्या आणखी आहेत...