आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चोरी करणारे अवघ्या दोन तासांत मुद्देमालासह जेरबंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पिकअप चालकाला रस्त्यात अडवून मोबाइल रोकड लांबवणाऱ्यांना भिंगार कॅम्प पोलिसांनी अवघ्या दोन तासांत जेरबंद केले. ही कामगिरी बुधवारी पहाटे सहायक निरीक्षक विनोद चव्हाण सहकाऱ्यांनी केली. आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील अण्णा दिलीप हजारे (३०, सरडेवाडी) हे पिकअप वाहनातून पशुखाद्य घेऊन जात होते. कापूरवाडी रस्त्यावरील नाक्याजवळ रात्री अकराच्या सुमारास दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी त्यांना अडवले. हजारे यांना धक्काबुक्की करुन हजार ८०० रुपयांचे दोन मोबाइल हजार रुपयांची रोकड हिसकावून त्यांनी धूम ठोकली. या काही वाहनचालकांनी हा प्रकार कॅम्प पोलिसांना कळवला.

कॅम्पचे सहायक निरीक्षक विनोद चव्हाण, कॉन्स्टेबल सचिन शिरसाठ, वाय. डी. सोनवणे, प्रदीप बोरुडे, धारके पाठक यांनी तत्काळ आरोपींचा शोध सुरु केला. शहरात गस्त घालताना पोलिसांना एक युवक दुचाकीवरुन जाताना दिसला. चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. झडतीमध्ये त्याच्याकडे एक चोरीचा मोबाइल सापडला. कसून चौकशी करताच त्याने गुन्ह्याची कबुली देत साथीदारांची नावे सांगितली. पोलिसांनी युवराज नानासाहेब सपकाळ (२५, गवळीवाडा, भिंगार) श्याम अंकुश इंगळे (१९, मातंगवाडा, निंबोडी) एक अल्पवयीन युवकास ताब्यात घेतले. गुरुवारी दुपारी सपकाळ इंगळे यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अल्पवयीन मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

चोवीस गुन्हे उघडकीस
सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी चोवीस तासांच्या आत जबरी चोरीच्या गुन्ह्याची उकल करत शंभर टक्के मुद्देमालाची वसुली करण्याची ही सलग नववी कामगिरी आहे. यापूर्वी नगर तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून काम करताना, तसेच कोतवाली पोलिस ठाण्यात कार्यरत असतानाही त्यांनी दरोडे जबरी चोऱ्यांचे तब्बल २४ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
बातम्या आणखी आहेत...