आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेरा तालुक्यांमध्ये निम्माही पाऊस नाही , जिल्ह्यात पाणीटंचाईत वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्ह्यातीलतेरा तालुक्यांमध्ये ऑगस्ट महिन्याच्या पंधरवाडा उलटूनही अकोले तालुका वगळात जिल्ह्याच्या इतर तालुक्यांमध्ये सरासरीच्या निम्माही पाऊस झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
जिल्ह्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान ४९७ िमलिमीटर आहे. जिल्ह्यात यंदा जूनपासूनच मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली होती. जून ते १५ जून या कालावधीत जिल्ह्याच्या बहुतांश भागात दमदार पाऊस झाला होता. त्यामुळे पहिल्या टप्प्यात खरिपाच्या पेरण्या समाधानकारक झाल्या होत्या. त्यानंतर मात्र पावसाचा जोर आेसारला होता. तब्बल अडीच महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवल्याने खरिपाच्या अडीच लाख हेक्टर क्षेत्रावर झालेल्या पेरण्या वाया गेल्या आहेत. पावसाअभावी दीड लाख हेक्टर क्षेत्रावर अजूनही पेरण्या झालेल्या नाहीत. २०१२ मध्ये पावसाचे अत्यल्प प्रमाण होते. त्यापेक्षाही वाईट परिस्थिती यंदाच्या पावसाळ्यात आहे. पावसाळ्याचे दिवस सरत आले आहेत. अजूनही पावसाची प्रतीक्षाच आहे.

जिल्ह्यातील चौदा तालुक्यांपैकी तेरा तालुक्यांमध्ये यंदा पावसाने निम्मी सरासरी आेलांडलेली नाही. १८ ऑगस्ट अखेरपर्यंत जिल्ह्यात १५७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अकोले तालुक्याची पावसाची सरासरी ४९३ मिलिमीटर आहे. या तालुक्यात ५३२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. उर्वरित सर्व तालुक्यांमध्ये १९० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झालेली नाही. पाथर्डी तालुक्यात आतापर्यंत केवळ १६.१६ टक्के पाऊस झाला आहे.
अकोले तालुक्यात सर्वाधिक १०७ टक्के पाऊस झाला. संगमनेर (२२), कोपरगाव (१८), श्रीरामपूर (१८), राहुरी (२३), नेवासे (३०), राहाता (३८), नगर (३५), शेवगाव (३२), पारनेर (२९), कर्जत (२०), श्रीगोंदे (२२) जामखेड (२५) टक्के पावसाची नोंद झालेली आहे. पावसाने पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांत पाण्याची टंचाई आहे. ऑगस्टमध्येही जिल्ह्यातील २८५ गावे हजार २६७ वाड्या-वस्त्यांवरील तब्बल सहा लाख ४० हजार नागरिकांना ३८५ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
ग्रामीण भागातून अजूनही टँकरला मागणी वाढत आहे. टँकरबरोबर काही भागात जनावरांच्या चाऱ्याचीही टंचाई निर्माण झाली आहे. शासनाने खरिपाच्या दुबार पेरणीसाठी अनुदान जाहीर केले असले, तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना अजूनही हे अनुदान मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. पावसाअभावी विहिरी, कूपनलिका, हातपंप देखील कोरडे पडत अाहेत.
चालू वर्षीचा पाऊस (मिमी)
तालुकासरासरी यंदाचा पाऊस संगमनेर ४१६ ९४
कोपरगाव ४१६ ८२
श्रीरामपूर ४६९ ८६
राहुरी ४७९ ११०
नेवासे ५३१ १६४
राहाता ४४० १६९
नगर ५२४ १८८
शेवगाव ५६३ १८३
पाथर्डी ५५० ८९
पारनेर ४७३ १४०
कर्जत ५०५ १०३
श्रीगोंदे ४४८ १००
जामखेड ६२६ १५६

अडीच लाख हेक्टरवर पेरण्या
जिल्ह्यातखरिपाच्या लाख १२ हजार हेक्टर क्षेत्रापैकी लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झालेल्या आहेत. ज्या क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत त्या क्षेत्रावरील पिके प्रामुख्याने मूग, उडीद, सोयाबीन ही पिके जळून गेली आहेत.परतीच्या पावसाची अपेक्षा असली, तरी दुबार पेरणी होईल की नाही याबाबत सांशकता आहे.'' अंकुशमाने, कृषी अधीक्षक अधिकारी.