आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...या बारवेची स्वच्छता कधी होणार?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - औरंगाबाद रस्त्यावरील बारवेत दरवर्षी लक्ष्मीनगर, निर्मलनगर, नित्यसेवा, वसंत टेकडी उपनगरांमधील मंडळांचे घरगुती गणेशांचे विसर्जन होते. या बारवेच्या सफाईबद्दल अनेकदा स्थानिक रहिवाशांनी मनपाकडे तक्रार करूनही कार्यवाही झालेली नाही.

दीड महिन्यापूर्वी मनपाचे काही अधिकारी संबंधित ठेकेदार या बारवेची पाहणी करुन गेले, पण ते परत आलेच नाहीत. यंदाही या बारवेत हजारो गणेश मूर्तींचे विसर्जन नागरिक करतील. पण तेथील अस्वच्छता पाहता श्रींचे विसर्जन येथे होऊ नये, अशी परिस्थिती आहे. चार दिवसांवर विसर्जन आले, तरी मनपा गप्पच आहे. महापौर, उपमहापौर नगरसेवकांनी तातडीने या बारवेची स्वच्छता कशी करता येईल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मनपा अधिकारी ठेकेदारांनी तातडीने बारवेची स्वच्छता करावी, अशी मागणी सोमनाथ चिपाडे, मच्छिंद्र चिपाडे यांनी केली आहे.
बातम्या आणखी आहेत...