आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावर्षी उसाच्या क्षेत्रात पंधरा हजार हेक्टर घट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुकाणे - तीव्र दुष्काळ अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील उसाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट झाली. साखर कारखान्यांच्या आकडेवारीनुसार उसाच्या क्षेत्रात १० ते १५ हजार हेक्टर घट झाली. त्याचा परिणाम गळीत हंगामावर होणार असून आपल्याच कारखान्याला ऊस मिळवण्यासाठी पळवापळवी होईल. असे असले तरी ज्या कारखान्याची एफआरपीनुसार दर देण्याची तयारी विश्वासार्हता आहे, अशाच कारखान्यास शेतकरी यंदा ऊस देतील.

साखर सम्राटांचा जिल्हा म्हणून नगरची ओळख आहे. साखर कारखानदारीवर जिल्ह्याचे अर्थकारण फिरते. मागील दोन वर्षांची दुष्काळीस्थिती साखरेला मिळत असलेल्या कमी भावामुळे या धंद्याला उतरती कळा लागली. यंदाच्या हंगामासाठी उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घट झाल्याने कारखान्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. उसाच्या पळवापळवीवरून कारखान्यांचा संघर्ष उडणार आहे. कारखान्यांचे गाळप पूर्ण क्षमतेने होईल, अशी शक्यता नाही. दोन-तीन महिन्यांतच आपले गाळप हंगाम आटोपते घ्यावे लागणार आहेत. या स्थितीत एफआरपीनुसार दर आणि उसाची टंचाई अशा दुहेरी संकटांत यंदा जिल्ह्यातील साखर कारखानदारी सापडली आहे. अशा बिकट परिस्थितीत जिल्ह्यातील २२ पैकी १९ कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू करण्याची तयारी केली आहे. बहुतांश कारखान्यांनी विजयादशमीस अग्निप्रदीपन केले .उसाच्या टंचाईबरोबरच यंदा एफआरपीनुसार भाव देण्याचे शासनाचे बंधन आहे. कारखानदार मागील वर्षीच्या गळीत हंगामातील साखरेला मिळालेल्या कमी भावासह कारखाना व्यवस्थापन खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याचा कांगोरा पिटवत असल्याने एकरकमी एफआरपीनुसार भाव देण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे यंदा जिल्ह्यात नेमके किती कारखाने उसाला रास्त भाव देतात हे पाहणे आैत्सुक्याचे ठरेल. मागील वर्षीच्या एफआरपीनुसार निघालेल्या उसाच्या दरामुळे कारखानदारांच्या नाकीनव आले. यासाठी शेतकरी संघटनांचे आंदोलने झाले. प्रदेश साखर संचालक कार्यालयात कारखान्यांकडे पाठपुरावा सुरू आहे. हे देणे बाकी असताना दुष्काळी पार्श्वभूमिवर उसाच्या टंचाईत यंदाचा गळीत हंगाम सुरू झाले. कारखानदार कारखाने आर्थिक अडचणीत असल्याचे सांगत आहेत. जिल्ह्यातील बऱ्याच नामांकित कारखान्यांनी दोन-दोन महिन्यांचे कामगारांचे पगार थकवलेले आहेत. शेतकऱ्यांचा उसाचे पैसा कामगारांच्या कष्टाचे पैसे थकवण्याचा सपाटा कारखानदारांकडून सुरू झाल्याने सहकारी साखर कारखानदारीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे.

नेवासे तालुक्यात ऊस लागवडीत घट
नेवासेतालुक्याला 'उसाचे आगर' म्हणून ओळखतात. यंदा तालुक्यातील मुळा ज्ञानेश्वर दोन्ही सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात कमी ऊस उपलब्ध आहे. ज्ञानेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आठ लाख मेट्रिक टन कमी ऊस उपलब्ध आहे. त्यामुळे गंगापूर, पैठणसह बाहेरून ऊस आणून आपले १२ लाख गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे उसाला कमी दर, दुष्काळी स्थिती अशा कचाट्यात ऊसउत्पादक शेतकरी सापडला आहे.

उसाची पळवापळवी
जिल्ह्यातील कारखान्यांनी प्रादेशिक सहसाखर संघ कार्यालयाकडे दिलेली उसाची आकडेवारी लाख १२ हजार ४१५ हेक्टर आहे. असे असले तरी उसाचे क्षेत्र एकच, तेच दोन-तीन कारखान्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात दाखवले आहे. शिवाय चाऱ्यासाठी रसवंतीसाठी मोठ्या प्रमाणात उसाची तोड झाल्याने प्रत्यक्ष गाळपासाठी कमी ऊस उपलब्ध असल्याने कारखान्यामध्ये उसाची पळवापळवी होणार.
बातम्या आणखी आहेत...