आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीजनिर्मितीतून थोरात कारखान्याची मोठी झेप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर - दिवंगत भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या आदर्शावर कारखान्याची ४९ वर्षांची वाटचाल यशस्वी झाली. आता सुवर्ण महोत्सवी वाटचाल आपण सुरू केली आहे. नवा कारखाना आणि वीजनिर्मितीच्या माध्यमातून आता आपली झेप पुढच्या ५० वर्षांकडे राहणार असल्याचे सांगत पुढील काळात संघर्ष आणि कष्टाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष माधवराव कानवडे होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, रणजितसिंह देशमुख, दुर्गा तांबे, मधुकर नवले, शंकर खेमनर, जगन्नाथ घुगरकर आदी व्यासपीठावर होते.

थोरात म्हणाले, नव्या कारखान्याद्वारे ट्रायल घेताना ८३ हजार मेट्रिक टनाचे यशस्वी गाळप झाले. या कारखान्यात तयार होणाऱ्या ३० मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्पातून ४१ लाख युनिट वीजविक्री केली. त्यातून दोन कोटींचे उत्पन्न मिळाले. आता आपल्याकडे स्वत:चा किमान १४ लाख टन ऊस असायला हवा. त्यातून ११ लाख मेट्रिक टनांचे उत्पादन घेता येईल. ऊस उत्पादकांनी एकरी शंभर टनांचे उद्दिष्ट ठेवून काम करायला हवे. रकार बदलले तसे प्रश्नदेखील बदलले. आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना मदतीचे धाेरण होते. निळवंडेसाठी सरकार मदत देत होते. आताच्या सरकारने ३०० कोटींची गरज असताना केवळ तीन कोटी दिले. सरकारचे एक मंत्री दोन वर्षांत निळवंडे कालव्यासह पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगतात, तर दुसरे मंत्री सरकार पैसे देऊ शकत नसल्याने लोकसहभागातून काम करण्याचा सल्ला देतात. दुर्दैवाने ही अवस्था निर्माण झाल्याने संघर्षाचे अनेक प्रश्न आपल्यापुढे येणार आहेत. हक्काच्या पाण्यासाठीही आता आपल्याला सर्वोच्च न्यायालयात जावे लागेल. त्यासाठी आपण संघटित होण्याची गरज थोरातांनी व्यक्त केली.
नांग्या ठेचल्या पाहिजेत
आपल्याकडेजे काही चांगले चालले ते अनेकांना देखवत नाही. वाॅर्डातदेखील निवडून येऊ शकणारे अनेक दुष्ट आत्मे आपल्याकडे आहेत. वेळीच त्यांच्या नांग्या ठेचल्या पाहिजेत, असे थोरात यांनी विरोधकांचा समाचार घेताना सांगितले.
अचिव्हमेंट साधल्या
थोरात कारखान्याने गेल्या वर्षभरात खूप चांगल्या चांगल्या अचिव्हमेंट साध्य केल्या. नवा कारखाना आणि वीजनिर्मिती प्रकल्प राज्यासाठी दिशादर्शक ठरला असून साखर उद्योगापुढे पुढील काळात खूप अडचणी हेत. डॉ. सुधीर तांबे, आमदार.
बातम्या आणखी आहेत...