आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समन्यायी पाणी वाटपाचा कायदा करण्यात थोरात यांचाही सहभाग, भाजपचे नेते चौधरींचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजपचे नेते राजेश चौधरी
संगमनेर - जायकवाडीला पाणी सोडण्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले असल्याने हे पाणी आता कोणीही थांबवू शकत नाही. हे पाणी जाण्यासाठी २००५ चा समन्यायी पाणी वाटप कायदा कारणीभूत ठरल्याने आणि हा कायदा करण्यात आमदार बाळासाहेब थोरात यांचा सहभाग असताना ते राज्य सरकारला बदनाम करत असल्याचा आरोप भाजपचे नेते राजेश चौधरी यांनी केला.

जायकवाडीला निळवंडे, भंडारदरा धरणातून पाणी सोडले गेले. याचे पदसाद लाभक्षेत्रात उमटत आहेत. संगमनेरमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी संगमनेर बंदचे आवाहन केले होते. यावेळी मोर्चासमोर बोलताना त्यांनी जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांचा आणि राज्य सरकारचा निषेध करत सरकारच्या समाचार घेतला. भाजपने आंदोलनापासून दूर रहात बुधवारी थेट थोरात यांनाच लक्ष्य केले. भाजपचे राजेश चौधरी यांनी यासंबंधी भूमिका स्पष्ट करत राज्यातील युती सरकारला बदनाम करून स्वत:चे पाप झाकण्यासाठी माजी मंत्री थोरात यांचा प्रयत्न सुरू आहे. माजी मंत्री मधुकर पिचड यांनी हे त्यांचेच पाप असल्याचे मान्य केल्याने थोरात यांनीही या कायद्याला समर्थन देण्याची केलेली चूक कबूल करत जिल्ह्याची माफी मागावी. औरंगाबादचे पालकमंत्रिपद स्वत:कडे असताना जायकवाडीला भंडारदरा, निळवंडे धरणातून पाणी सोडण्याची सुरुवात त्यांनीच केली, याचा थोरात यांना विसर पडला. राज्यातील सत्ता बदलाचा परिणाम जाणवू लागला असून तत्कालीन महसूल पालकमंत्री असलेले थोरात जायकवाडीला पाणी देण्याचे समर्थन करत होते. त्यावेळी ते गप्प होते. आता सत्ता जाताच जायकवाडीला पाणी देण्याच्या कारणावरून त्यांनी राज्य सरकारवर टीका सुरू केली. पाणीप्रश्नावरून आता लोकांची ते दिशाभूल करत आहेत. त्यावेळीच कायद्यातील दोष त्यांच्या लक्षात आले होते, तर त्यांनी या कायद्याला त्यावेळी विरोध करणे गरजेचे होते.

'थोरात'ने कोणते सामाजिक उपक्रम राबवले
बाळासाहेबथोरात यांनी १५ वर्षे मंत्रिपद उपभोगले, तरीही तालुक्याचा पाणीप्रश्न सुटला नाही. तालुक्यातील सर्व गावे दुष्काळग्रस्त जाहीर होतात हे त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे द्योतक आहे. हिवरे बाजारचे पोपट पवार यांनी आमदारकी, खासदारकी नसताना पाण्याचा प्रश्न सोडवला. थोरात अशा रितीने प्रश्न सोडवू शकले असते. संजीवनी, अशोक, प्रवरा कारखान्यांनी त्यांच्या भागात बंधारे बांधले. थोरात कारखान्याने कोणते सामाजिक उपक्रम राबवले, असा सवाल चौधरी यांनी केली.
बातम्या आणखी आहेत...