आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काेपर्डीतील अाराेपींच्या वकिलांना अज्ञात लाेकांकडून धमकी; पाच दिवसांनंतर निकाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- राज्यभर गाजलेल्या कोपर्डी खटल्याचा निकाल पाच दिवसांवर येऊन ठेपला असताना बचाव पक्षाच्या वकिलांना धमकीसत्र सुरू झाले आहे. मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेच्या वतीने काम पाहण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणाने नियुक्त केलेले वकील योहान मकासरे यांना अज्ञात लाेकांकडून धमकी आली आहे. दोन दिवसांपूर्वी अारोपी भैलुमेचे वकील प्रकाश आहेर यांनाही जिवे मारण्याची धमकी आली होती. आता अॅड. मकासरे यांना धमकीचे फाेन सुरू झाले आहेत. 

 
कोपर्डी (ता. कर्जत) येथील शाळकरी मुलीवर जुलै २०१६ मध्ये क्रूरपणे बलात्कार करून तिचा खून करण्यात आला. या खटल्यातील तिन्ही आरोपींचे वकीलपत्र न घेण्याचा ठराव वकील संघटनेने केला होता. त्यामुळे नगरमधून कोणीही आरोपींचे वकीलपत्र घेतले नाही. नंतर सहआरोपी संतोष भवाळ याच्या वतीने पुण्यातील वकील बाळासाहेब खोपडे व विजयालक्ष्मी खोपडे यांनी वकीलपत्र स्वीकारले. नितीन भैलुमे याच्या वतीने अॅड. प्रकाश आहेर यांनी वकीलपत्र स्वीकारले. मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याच्या वतीने मात्र अखेरपर्यंत कोणीही वकीलपत्र दाखल केले नाही. त्यामुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने त्याची बाजू  मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ योहान मकासरे यांची नियुक्ती केली हाेती.  

बातम्या आणखी आहेत...