आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - गुप्तबातमीदारा कडून मिळालेल्या माहितीनुसार केलेल्या कारवाईत खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी दुपारी ही कारवाई केली. दिलीप गीताराम दहातोंडे (चांदा, ता. नेवासे) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध नेवासे पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे. अधिक तपासाकरिता त्याला नेवासे पोलिसांकडे सोपवण्यात आले.

पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी, अतिरिक्त अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शशिराज पाटोळे यांच्या पथकातील उपनिरीक्षक राजकुमार हिंगोले, हेड कॉन्स्टेबल मधुकर शिंदे, पोलिस नाईक दादासाहेब काकडे, कॉन्स्टेबल दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, विनोद मासाळकर, सचिन कोळेकर, जयवंत तोडमल यांच्या पथकाने या कारवाईत भाग घेतला.

दुस एका कारवाईत नगर तालुका पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी पप्पू ऊर्फ पोपट दत्तात्रेय शेळके (रुपेवाडी, ता. नेवासे) धनंजय ऊर्फ धनू जगन्नाथ धाडगे (चांदा, ता. नेवासे) यांनाही अटक करण्यात आली. या दोन्ही आरोपींना गुन्ह्याच्या अधिक तपासाकरिता नगर तालुका पोलिसांच्या हवाली करण्यात आले अाहे. ही कारवाईही स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने रविवारी दुपारी केली.
बातम्या आणखी आहेत...