आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Three And A Half Thousand Police Appointed For Elections

निवडणुकीसाठी साडेतीन हजार पोलिस नियुक्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्ह्यातील ६८७ ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी (४ ऑगस्ट) होत असलेल्या मतदानाकरिता साडेतीन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्ह्यातील हजार ४६९ बूथवर मतदान होणार आहे. जिल्हा पोलिस दलासह बाहेरुनही अतिरिक्त पोलिसांचा बंदोबस्त मागवण्यात आला आहे. निवडणुका शांततेत पार पडाव्यात, यासाठी रविवारी सायंकाळपर्यंत ७०० हून अधिक जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

एकाच वेळी अनेक ग्रामपंचायतींची निवडणूक होत असल्याने पोलिसांवर ताण पडणार आहे. जिल्ह्यात तीन हजार पोलिस कर्मचारी आहेत. त्यांपैकी हजार ७६५ जण ९२ अधिकारी निवडणूक बंदोबस्तासाठी नेमण्याचे नियोजन होते. याशिवाय अधिकारी, ६१७ पोलिस, हजार २५ गृहरक्षक दलाचे जवान, राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्या मिळाव्यात, अशी मागणी पोलिस महासंचालक कार्यालयाकडे करण्यात आली होती.

जिल्ह्यातील तुटपुंजे मनुष्यबळ लक्षात घेता पोलिस महासंचालकांकडे अतिरिक्त बंदोबस्त प्रशासनाच्या वतीने मागण्यात आला होता. मिळालेल्या अतिरिक्त पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांसह आता सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त जिल्ह्यात असणार आहे. प्रत्येक बूथवर एक कर्मचारी, तर चार बूथ असलेल्या केंद्रांवर दोन अतिरक्त कर्मचारी नियुक्त केले जातील. संवेदनशील अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर एका अधिकाऱ्यासह राज्य राखीव पोलिस दलाचे जवान तैनात असतील. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी, दोन अतिरक्त पोलिस अधीक्षक, इतर उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया पार पडेल.

असा असेल बंदोबस्त
पोलिस अधीक्षक, अतिरिक्त पोलिस अधीक्षक, उपअधीक्षक, २० पोलिस निरीक्षक, ८३ सहायक पोलिस निरीक्षक उपनिरीक्षक, हजार ३३० पोलिस कर्मचारी, हजार २५ होमगार्डस, राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्या. ९२ संवेदनशील केंद्रे, १० अतिसंवेदनशील केंद्रे.