आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वामी समर्थांची तीन अस्सल छायाचित्रे नगर शहरामध्ये उपलब्ध, स्वामी समर्थ भक्तांना मिळणार मोफत प्रती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोडॅॅॅक कंपनीच्या छायाचित्रकाराने सन १८७५ मध्ये टिपलेले अविस्मणीय क्षण, कंपनीकडे समर्थांच्या ३३ निगेटिव्ह जतन, स्वामी समर्थांच्या छायाचित्राची कथाही आहे विलक्षण 
नगर- अक्कलकोटचे स्वामी समर्थांचे कोट्यवधी भक्त आहेत. स्वामी भक्तांना आतापर्यंत स्वामींची फक्त चित्रे उपलब्ध होती. आता त्यांची तीन अस्सल छायाचित्रे नगरमध्ये उपलब्ध झाली आहेत. विशेष म्हणजे, ही छायाचित्रे सन १८७५ मधील आहेत. स्वामी समर्थांचे भक्त दीपक शाह यांनी भाविकांसाठी तीन छायाचित्रे पुन्हा मोफत उपलब्ध केली आहेत. या आधीही त्यांनी सन २०१४ मध्ये दोन छायाचित्रे उपलब्ध केली होती. 
 
आज छायाचित्रणाची कला शिखरावर आहे. अद्ययावत तंत्रज्ञानामुळे शर्टच्या बटनांमध्येत काय पण शरीरातील रक्त वाहिनीत जाऊ शकणारे कॅमेरे तयार झाले आहेत. या काळात स्वामी समर्थांच्या छायाचित्राची कथाही विलक्षण आहे. स्वामींचे पुण्याचे एक भक्त यांनी आपले नाव कोणत्याही परिस्थितीत छापण्याच्या अटीवर ही माहिती ‘दिव्य मराठी’ला दिली. 

जॉर्ज इस्मन कोडॅक यांनी सन १८५० ते ५६ दरम्यान कॅमेरा तयार केला. खऱ्या अर्थाने ते कॅमेऱ्याचे जनक. त्यावेळी त्यांची कोडॅक कंपनीच स्वत: छायाचित्रे काढायची. त्यावेळी छायाचित्रकाराला स्वत: प्लेट तयार करून त्यावर सिल्व्हर नायट्रेट हे रसायन लावून छायाचित्र काढावे लागायचे. मार्केटिंगसाठी कंपनीने त्यांचा एक प्रतिनिधी इंग्लंडचे छायाचित्रकार बुथवेल सॅमसन यांना भारतात पाठवले. ते मुंबईला आले. तेथे त्यांना स्वामी समर्थांबद्दल समजले.
त्यावेळी चार जानेवारी १८७० च्या ‘थिआॅसॉफिस्ट’च्या अंकात स्वामी समर्थांचे दर्शनालावर्षाला चार लाख लोक अक्कलकोटला जातात असे वर्णन छापून आले होते. ते सॅमसन यांच्या पाहण्यात आले. त्यांनी अक्कलकोटला जाण्याचे ठरवले. ते रेल्वेने कुर्डूवाडीला गेले. तेथून पुढे मात्र त्यांना अक्कलकोटला बैलगाडीने जावे लागले. कारण रेल्वे फक्त कुर्डूवाडीपर्यंतच होती. सॅमसन स्वामींपर्यंत अक्कलकोटला दुपारपर्यंत पोहोचले. त्यांनी स्वामींची परवानगी घेऊन खोक्यासारख्या कॅमेऱ्यातून स्वामींची ३३ छायाचित्रे काढली. परवानगी घेता काढलेले एकही छायाचित्र आले नाही, असे स्वामींच्या पुण्याच्या एका भक्ताने ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. 

स्वामींच्या या ३३ छायाचित्रांपैकी २२ छायाचित्रांच्या निगेटिव्ह कंपनीने जतन केल्या आहेत. छायाचित्रे काढण्याची घटना सन १८७५ मधील आहे. त्यानंतर स्वामी नगरमध्ये आले होते. त्यावेळी त्यांच्या शिष्य वांबोरीकर यांच्या घरीही त्यांचे छायाचित्र संबंधित छायाचित्रकार सॅमसन यांनी काढले. तेही शाह यांच्या संग्रहात आहे. आता शहा यांनी नव्याने स्वामींचे वामकुक्षी घेतानाचे छायाचित्र प्रकाशित केले आहे. त्याच्या पाचशे प्रती त्यांनी खास स्वामी भक्तांसाठी मोफत उपलब्ध केल्या आहेत
 
स्वामी समर्थ भक्तांना मिळणार मोफत प्रती 
स्वामीसमर्थांच्या अस्सल छायाचित्रांपैकी शाह यांना तीन छायाचित्रे उपलब्ध झाली आहेत. त्यांच्या त्यांनी शेकडो प्रती काढल्या असून, त्या त्यांनी भाविकांसाठी मोफत उपलब्ध केल्या आहेत. ही छायाचित्रे १८७५ मधील आहेत. इच्छुक भक्तांनी दीपक शाह, बंगला क्रमांक ४, पत्रकार वसाहत, सावेडी रोड येथे (मोबाइल क्र. ९२०९२२३१२३) आधी संपर्क साधून मग येण्याचे आवाहन शाह यांनी केले आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...