आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामूहिक बलात्कार, खूनप्रकरणी तिघे दोषी; अाराेपींना अाज सुनावणार शिक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- लोणी मावळा (ता. पारनेर) येथे दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून केल्याप्रकरणी तीन नराधम व क्रूर आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी साेमवारी दोषी ठरवले. या आरोपींना मंगळवारी शिक्षा सुनावली जाणार आहे. खटल्यात सरकारतर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी काम पाहिले.   

संतोष लोणकर, मंगेश लोणकर व दत्तात्रय शिंदे अशी नराधम आरोपींची नावे आहेत. २२ ऑगस्ट २०१४ रोजी सायंकाळी पाऊस सुरू असल्याने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या १६ वर्षीय मुलीवर त्यांनी बलात्कार केला. आरडाओरडा करू नये म्हणून तिच्या नाकातोंडात चिखल काेंबला. तसेच धारदार स्क्रू-ड्रायव्हर तिच्या कपाळावर, कानाजवळ, छातीवर खुपसून निर्घृणपणे तिचा खून केला. पारनेर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवला होता.  

नराधम आरोपी संतोष लोणकर पीडितेचा काही दिवसांपासून पाठलाग कराराचा, अश्लील शब्द वापरून तिला सोबत चल म्हणायचा, जिवे मारण्याची धमकी द्यायचा, अशी माहिती तपासात समाेर अाली. गावातील एका टपरीचालकाने संतोष लोणकरने या कृत्याची कबुली आपल्याजवळ फुशारकी मिरवत दिल्याचे सांगितले हाेते. दोन सहआरोपींची नावेही सांगितली.  

अाराेपी चुलते-पुतणे  
पोलिसांनी घटनेच्या दुसऱ्याच दिवशी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. गुन्ह्यात वापरलेली हत्यारेही काढून दिली. पोलिसांनी हत्यारे व आरोपींचे कपडेही जप्त केले. अधिक तपासात आरोपींनी केलेल्या क्रौर्याचा पाढा वाचला. पीडितेवर कॅनॉल चारीच्या पुलाखाली बलात्कार करून तेथेच टाकले होते. तिचे शरीर पूर्ण गाळाने माखलेले होते. या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण ३२ साक्षीदार तपासण्यात आले. खटल्यातील महत्त्वाचे साक्षीपुरावेही सादर करण्यात आले.  तिन्ही आरोपी ते तीस ते चाळीस वयोगटातील आहेत. मुख्य आरोपी संतोष व सहआरोपी मंगेश लोणकर  हे चुलते-पुतणे आहेत.   दरम्यान, या प्रकरणासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी केली होती. त्यानुसार त्यांची नियुक्ती  झाली. त्यांच्या प्रखर युक्तिवादामुळे व पोलिसांच्या अथक प्रयत्नांमुळे पीडितेला न्याय मिळाला, अशी भावना अण्णांनी व्यक्त केली. 
बातम्या आणखी आहेत...