आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरपूरमध्ये तीन दिवस स्वच्छता अभियान, श्रमादानातून गोळा केला १५ ट्रॉली कचरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - आषाढ वारी संपल्यानंतर नगरच्या आर्ट आॅफ लिव्हिंग शाखेच्या ६० कार्यकर्त्यांनी पंढरपूरमध्ये जाऊन सलग तीन दिवस स्वच्छता अभियान राबवले. सुमारे १५ ट्रॉली कचरा जमा करून त्याचे विघटन करण्यात आले. पंढरपूरकरांनी या उपक्रमाचे कौतुक केले. हे अभियान दरवर्षी राबवण्याचा संकल्प नगर शाखेने केला आहे. माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या युवक नेतृत्व प्रशिक्षण शिबिराचे जिल्हा समन्वयक अमर कळमकर (श्रीगोंदे), योगेश काकडे (शेवगाव), प्रमोद नलगे (श्रीगोंदे), कुमार खामकर (घारगाव), प्रदीप जाधव, प्रणव हरकळे स्वाती शेटे (तिघेही सोनई), पूनम थोरात (नगर), सचिन नागपुरे (भिंगार), दिग्विजय परदेशी (कोपरगाव) अन्य कार्यकर्ते पंढरपूरला पोहोचले. त्यांना जिल्हा विकास कमिटीचे समन्वयक राजेंद्र साबळे (रामपूर, ता. राहुरी) यांनी विशेष सहकार्य केले. पंढरपूर येथील राम कदम यांच्यासह आर्ट ऑफ लिव्हिंगचे २० स्वयंसेवकही ज्ञानेश्वर आघाव (बीड) यांच्यासह अभियानात सहभागी झाले.

चंद्रभागा नदीच्या वाळवंटात कुजू लागलेला कचरा, तुटलेल्या चपला, प्लास्टिक पिशव्या असे दोन ट्रक खराब साहित्य उचलण्यात आले. गावातील तीन किलोमीटर लांबीच्या प्रदक्षिणा मार्गावरून पाॅलिथिन, खेळण्याची खोकी, बांगड्यांच्या काचा, कागद असे दुकानाच्या लाकडी फळ्यांखाली साचवून ठेवलेले साहित्य बाहेर काढून गोण्यांतून कचराकुंड्यात भरण्यात आले. असे एकूण ट्रॅक्टर साहित्य निघाले. गोपाळपुरा पूल ते शेडदरम्यानच्या किलाेमीटर अंतरावरील दर्शन रांगेत पडलेल्या पेपरप्लेट, द्रोण, चहाचे कप, पत्रावळ्या असे ट्रॅक्टर साहित्य जमा करून नंतर त्याचे विघटन करण्यात आले.

गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवसापर्यंत राबवण्यात आलेल्या या स्वच्छता अभियानाबद्दल पंढरपूर नगरपालिका प्रशासनासह रहिवासी विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने नगर जिल्ह्यातील स्वयंसेवकांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यात आली. स्वच्छ करू पंढरपूर, हे ब्रीद समाेर ठेवून स्वयंसेवकांनी प्रथमच असे स्वच्छता अभियान राबवले.

समारोप करताना यापुढे दरवर्षी असे अभियान राबवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. यापुढील काळात अनेक कार्यकर्ते अशा कार्यात सहभागी केले जातील, असे सांगण्यात आले. युवकांना निरपेक्ष सेवेसाठी प्रवृत्त करणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
पंढरपूरमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अभियानात नगर

एक तास आपल्या देशासाठी द्यायलाच हवा....
माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी देशासाठी एक तास द्या, असे आवाहन देशवासीयांना केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कृतीतून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. पंढरपूरमध्ये पोहोचून सलग तीन दिवस लाजता स्वच्छता अभियान राबवण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील स्वयंसेवकांचे आपापल्या गावात परतल्यानंतर कौतुक होत आहे. श्रीश्री रविशंकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने हा उपक्रम राबवण्यात आला.