आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान! शिर्डीत वावरतोय \'सीरियल किलर\'? तीन भिकार्‍यांचे मृतदेह आढळले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- 'सबका मालिक एक' असा संदेश देणारे आणि देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीत आज (सोमवार) तीन भिकार्‍यांचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिर्डीत 'सीरियल किलर' तर वावरत नाही ना, या भीतीमुळे शिर्डीकर अस्वस्थ झाले आहेत. पैशाच्या व्यवहारातून या तीघांची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे.
शिर्डी रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या ज्ञानेश्वर मंदिराजवळ एक, नगर-मनमाड मार्गावरील हॉटेल कलासाई परिसरात दुसरा तर शासकीय विश्रामगृहाजवळ तिसरा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वीही साईनगर रेल्वे स्टेशन परिसरात दोन भिकार्‍यांची हत्या झाल्याचे उघडकीस आले होते. तिन्ही भिकार्‍यांच्या डोक्यात सळई आणि काठीने हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली आहे.
15 दिवसांपूर्वी दोन आणि आ‍ता तीन मृतदेह आढळल्याने शिर्डीत 'सीरियल किलर' वावरत असल्याची भीतीही वर्तवली जात आहे.