आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Three Donation Box Broken In Rahuri, Two Lakh Rupees Stolen

राहुरीत तीन दानपेट्या फोडल्या, दोन लाखांचा ऐवज लांबवला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुरी - राहुरी तालुक्यात चोरांनी शुक्रवारी (३ एप्रिल) मध्यरात्री तीन मंदिरांतील दानपेट्या फोडून सुमारे दोन लाखांचा ऐवज लांबवला. राहुरीचे ग्रामदैवत खंडेराय देवस्थान, बालाजी मंदिर, तर तालुक्यातील तांभेरे येथील श्रीराम मंदिरात हा प्रकार घडला.

राहुरीचे ग्रामदैवत खंडेराय यात्राेत्सव रविवारी (५ एप्रिल) सुरू होत आहे, तर तांभेरे येथील श्रीराम मंदिराची यात्रा नुकतीच झाली. खंडेराय देवस्थानात चोरांनी १५० किलो वजनाची दानपेटी फोडली. दानपेटी शेजारच्या शेतात नेऊन एक लाख ३५ हजार रुपये पळवले. त्यानंतर चोरट्यांनी बालाजी मंदिराकडे मोर्चा वळवून तेथील दानपेटी लांबवली आणि ३० हजारांचा ऐवज पळवला. त्यानंतर चोरांनी तांभेरेतील श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील ४० ते ५० हजार रुपये लांबवले. भाविक शनिवारी सकाळी काकड आरतीसाठी मंदिरात अाल्यावर हा प्रकार लक्षात आला. राहुरी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

सध्या ठिकठिकाणी ग्रामदैवतांच्या यात्रा सुरू आहेत. यात्राकाळात पुरेसा पोलिस बंदोबस्त मिळत नसल्याने असे प्रकार घडत आहेत. राहुरीतील खंडेराय मंदिर यात्रा समितीच्या वतीने यात्रोत्सव काळात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची घोषणा केली. परंतु त्यापूर्वीच चोरट्यांनी दानपेटी लांबवल्याची चर्चा सुरू आहे.