आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाथर्डी तालुक्यात तीन घटनांत तिघांचा मृत्यू ; मंगळवार ठरला घातवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी- तालुक्यासाठी मंगळवार घातवार ठरला. तीन वेगवेगळ्या घटनांत तिघांचा मृत्यू झाला. करोडी येथील अजित खेडकर या शाळकरी मुलाला विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. मोहोज देवढे येथील रंजना गर्जे यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला, तर तनपूरवाडी येथील चैतन्य चव्हाण या तरूणाचा अपघाती मृत्यू झाला. रस्त्याच्या कामामुळे चव्हाण यांचा मृत्यू झाल्याने ठेकेदार अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी मृतदेह रस्त्यावर ठेवून तनपरवाडी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. टेम्पोची धडक बसून चव्हाण यांचा मृत्यू झाला. या रस्त्याचे काम सुरू असून ठेकेदाराने ठिकठिकाणी खोदल्यामुळेच चव्हाण यांना प्राण गमवावे लागले, असे गावकऱ्यांचे म्हणणे होते. दुपारी तनपुरवाडी फाटा येथे मृतदेह ठेवून आंदोलन करण्यात आले. ठेकेदारावर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय अंत्यसंस्कार करायचे नाहीत, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली होती. तहसीलदार नामदेव पाटील यांनी या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार उपस्थित होते. अन्य घटनेत करोडी येथील अजित खेडकर (९) हा मुलगा वीजपंप चालू करण्यासाठी गेला असता विजेचा धक्का बसून मरण पावला. मोहोज देवढे येथील रंजना गर्जे (४५) शनिवारी सायंकाळी घरातून निघून गेल्या. नातेवाईकांनी सगळीकडे शोध घेतला. मंगळवारी सकाळी गावातील बाबभाई शेख यांच्या विहिरीत रंजना यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. 
 
बातम्या आणखी आहेत...