आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सव्वातीन लाख शेतक-यांना 296 कोटींची वीजबिल माफी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - कृषी ग्राहकांवरील वीजबिलाच्या थकीत रकमेचा बोजा कमी करण्यासाठी राज्य शासनाने कृषी संजीवनी योजना 2014 लागू केली आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील 3 लाख 23 हजार 366 शेतक-यांना 296 कोटी 7 लाख 85 हजार 520 रुपयांची वीज बिलांची माफी मिळणार आहे.

थकबाकीतून मुक्त होण्याची संधी कृषी संजीवनी योजनेद्वारे मिळणार आहे. या योजनेंतर्गत कृषी ग्राहकांनी 31 मार्च 2014 पर्यंतच्या थकबाकीतील मूळ रकमेची 50 टक्के रक्कम एक रकमी किंवा तीन मासिक हप्त्यांत भरल्यास उरलेली 50 टक्के मूळ रक्कम व थकीत असलेले पूर्ण व्याज व दंड माफ होणार आहे. थकबाकीची रक्कम शेतक-यांना तीन हप्त्यांत भरता येईल. त्यापैकी पहिला हप्ता किमान 20 टक्के 31 ऑगस्ट 2014 पर्यंत, दुसरा हप्ता कमीत कमी 20 टक्के - 30 सप्टेंबर 2014 पर्यंत आणि उरलेली रक्कम 31 ऑक्टोबरपर्यंत भरावयाची आहे. कृषी ग्राहक 50 टक्के थकबाकीची रक्कम एक रकमीही भरू शकतील. 31 मार्च रोजी ज्या शेतक-यांकडे कृषिपंपाची कुठलीही थकबाकी नसणार, त्यांना पुढील दोन त्रैमासिक बिलात (सहा महिने) 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील 3 लाख 23 हजार 366 शेतक-यांना 296 कोटी 7 लाख 85 हजार 520 रुपयांची वीजबिलांची माफी मिळणार आहे. या शेतक-यांचे 11 कोटी 43 लाख 419 रुपयांचे व्याज व दंडही माफ होणार आहे.

...तर विद्युत कायदा 2003 नुसार कारवाई
ज्या कृषी ग्राहकाने योजनेत सहभाग घेतला नाही किंवा योजनेंतर्गत ठरवण्यात आलेल्या रकमेचा भरणा केला नाही, अशा ग्राहकांना योजनेसाठी अपात्र ठरवण्यात येईल. त्यांच्या खात्यात व्याज व दंडासह रक्कम दर्शवण्यात येईल. अशांंवर विद्युत कायदा 2003 नुसार वसुलीसाठी कारवाई करण्यात येईल.

नियमित बिल भरणा-यांना मिळणार सवलत
ज्या शेतकरी नियमित वीजबिल भरतात. त्यांना सहा महिन्यांच्या वीजबिलात 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. हा बोजा राज्य सरकार उचलणार आहे. या योजनेचा थकबाकीदार शेतक-यांनी लाभ घ्यावा आणि थकबाकीतून मुक्त व्हावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
विभागनिहाय वीजबिल माफी मिळालेल्या शेतक-यांची संख्या
विभाग माफी मिळालेले शेतकरी माफ व्याज व दंड 50 टक्के माफीची रक्कम
नगर ग्रामीण 82525 360307 900767806
नगर शहर 46488 14509007 362725270
कर्जत 70384 29535627 738390797
संगमनेर 74660 30161064 754036743
श्रीरामपूर 49809 810950012 204874904
एकूण 323366 118431419 2960785520