आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Three Men Arrested In The Case Of Looting Jewellary

साईभक्त महिलांचे दागिने लुटणारे तीन जण जेरबंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी - दोन अज्ञात तरुणांनी शिर्डीत आलेल्या महिला भाविकांच्या गळ्यातील सुमारे सव्वा तीन लाख रुपयांचे दागिने ओरबाडून दुचाकीवरून पलायन केले होते. पोलिसांनी या प्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची दुचाकीही जप्त केली. राहता न्यायालयाने या तिघांना पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.


एच. एस. जालीअली (रा. आंध्र प्रदेश) हे बुधवारी सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास आपली पत्नी व भावजयी यांच्या समवेत शिर्डीतील बसस्थानकासमोरून साईबाबांच्या दर्शनासाठी जात होते. याच वेळी काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी या दोन महिलांच्या गळ्यातील सुमारे एक लाख ऐंशी हजार किंमतीचे सहा तोळे वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र ओरबाडून पलायन केले. दुस-या घटनेत, रघुनंद सर्वन्यभ (36 रा. बंगळुरू) हे आपल्या आई व इतर नातेवाइकांसमवेत सार्इंच्या दर्शनासाठी जात असताना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघांनी रघुनंद यांची आई वेदन्ना यांच्या गळ्यातील पाच तोळे वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र ओरबाडून धूम स्टाइलने पलायन केले. याबाबत शिर्डी पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे. बुधवारी मध्यरात्रीच मोईन फारूख शेख सादीर मन्सुरी व सचिन खैरे या तीन आरोपींना अटक केली.