आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन अल्पवयीन मुलांना पळवले, अज्ञात व्‍यक्तिविरोधात गुन्‍हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- काष्टी(ता. श्रीगोंदे) येथील तीन अल्पवयीन मुले शाळा व क्लासला चाललो म्हणून घराबाहेर पडली. शाळेत मुले नसल्याचे पालकांना समजल्यानंतर शोध मोहीम सुरु झाली. त्यानंतर विश्वनाथ दत्तात्रय गावडे (४२) यांनी श्रीगोंदे पोलिसांत तक्रार दाखल केली.
 
त्यावरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात फूस लावून पळून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तुषार विश्वनाथ गावडे (१६), ऋषिकेश अशोक गावडे(१६), ज्ञानेश्वर संतोष नागे(१६) अशी या मुलांची नावे आहेत. हे तिघे रिक्षाने दौंडकडे गेल्याचे समजले. दौंड परिसरात पालकांनी मुलांचा शोध घेतला. तेथेही काही तपास लागला नाही. ऋषिकेश गावडेच्या मामाने ज्ञानेश्वर नागेच्या मोबाइलवर संपर्क साधला. तो फोन पुण्यात लागला एका अनोळखी महिलेने तो फोन उचलून आपल्याला हा फोन रेल्वेस्थानकात सापडल्याचे सांगितले. पुन्हा फोन लावला असता तो फोन बंद लागला. दरम्यान, या मुलांकडे पैसे असल्याचे त्यांच्या काही मित्रांनी पोलिसांना सांगितले. या प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...