आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमय्या विद्यालयाच्या शिक्षकासह तिघांना अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्‍मक फोटो - Divya Marathi
प्रतिकात्‍मक फोटो
श्रीरामपूर- येथीलहिंद सेवा मंडळाच्या के. जे. सोमय्या विद्यालयामधील शालेय पोषण आहाराचा तांदूळ काळ्या बाजारात विकला जात असल्याचे मंगळवारी (७ जुलै) उघड झाले. संगमनेर येथे विकण्यासाठी मालवाहू रिक्षातून नेला जाणारा तांदूळ पोलिस उपअधीक्षक राकेश ओला यांच्या पथकाने पकडला. याप्रकरणी विद्यालयाच्या दशरथ भोंगळे या शिक्षकासह अन्य तिघांना अटक करण्यात आली आहे.
सोमय्या विद्यालयातील तांदूळ काळ्याबाजारात विक्रीसाठी जात असल्याची माहिती ओला यांना मंगळवारी मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने सापळा रचून दुपारी वाजेच्या सुमारास श्रीरामपूर-वाकडी रस्त्यावरील एमआयडीसी परिसरात ही तांदूळ घेऊन रिक्षा पकडली. रिक्षामध्ये २० पोती तांदूळ होते. पथकाने ही रिक्षा, मुद्देमाल चालक शहर पोलिसांच्या ताब्यात दिला.
पोलिस उपअधीक्षक राकेश ओला यांनी तत्काळ शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली.

चौकशीनंतर पकडलेला तांदूळ हा शालेय पोषण आहाराचाच असल्याचे सिद्ध झाले. सोमय्या हायस्कूलचे मुख्याध्यापक विठ्ठल बुधा भांगरे यांनी रात्री उशिरा फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, शिक्षक दशरथ भोंगळे हे विद्यालयात मध्यान्ह भोजनाची जबाबदारी पार पाडतात. त्यांनी चालक रिझवान शाह, ठेकेदार विजय नरवडे यांच्याशी संगनमत करून ५० किलो वजनाचे २० पोते तांदळाचा अपहार करून शाळेची फसवणूक केली.

त्यावरून पोलिसांनी शिक्षक दशरथ भोंगळे, शालेय पोषण आहाराचा ठेकेदार विजय नरवडे, रिक्षाचालक रिझवान शाह, तसेच तांदूळ घेणारा बबलू बाळासाहेब म्हस्के (सर्व रा. श्रीरामपूर) यांच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम ४०९, ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी दुपारी चौघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी सुनावली.

दरम्यान, शहरात पोषण आहाराचे खाद्य पदार्थ विकणारी विकत घेणारी मोठी टोळी सक्रिय असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. अनेक ठिकाणी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडूनच त्यांना पाठिंबा मिळतो. याप्रकरणात पोलिसांनी सखोल चौकशी केल्यास मोठे रॅकेट बाहेर येऊ शकते.


दरम्यान, शहरात पोषण आहाराचे खाद्य पदार्थ विकणारी विकत घेणारी मोठी टोळी सक्रिय असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. अनेक ठिकाणी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडूनच त्यांना पाठिंबा मिळतो. याप्रकरणात पोलिसांनी सखोल चौकशी केल्यास मोठे रॅकेट बाहेर येऊ शकते.
दडपण्याचा प्रयत्न

काळ्याबाजारात तांदूळ विक्रीसाठी घेऊन जाणारी रिक्षा पकडल्याची वार्ता शहरात पसरल्यानंतर आरोपींना वाचवण्यासाठी पोलिस ठाण्यासमोर मोठी गर्दी झाली. गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी पोषण आहाराच्या ठेकेदारापासून थेट हिंद सेवा मंडळाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मंडळाचे पदाधिकारी, शाळेचे अध्यक्ष हे ठेकेदारासह पोलिस ठाण्याच्या आवारात ठाण मांडून होते.

कारवाई करणार
तांदूळ अपहार प्रकरणी कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही. त्यासाठी हिंद सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेतली जाईल. संबंधित शिक्षकावर काय कारवाई केली जाईल. याबाबत यात निर्णय होईल. शालेय पोषण आहाराची जबाबदारी बचत गचत गटाकडे आहे. ते काम त्यांच्याकडे ठेवायचे की नाही याबाबतही या बैठकीमध्ये निर्णय घेतला जाईल.'' संजयजोशी, सहसचिव, हिंद सेवा मंडळ, नगर.