आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन घटनांमध्ये तीन जणांचा बुडून मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नगर तालुक्यात बुधवारी (13 नोव्हेंबर) घडलेल्या दोन विविध घटनांमध्ये तीन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. यामध्ये माय-लेकाचा समावेश आहे.

अंजली सोमनाथ दानवे (32) व सोहम (7, दोघेही वाणीनगर, पाइपलाइन रस्ता, नगर) अशी मृत माय-लेकाची नावे आहेत. दानवे या मुलासमवेत बुधवारी सायंकाळी त्यांचे मूळ गाव असलेल्या बारादरी शिवारातील तलावाजवळ फिरण्यास गेल्या होत्या. यावेळी फिरत असताना अचानक तोल जाऊन दोघेही पाण्यात पडले. बेशुद्धावस्थेत त्यांना बाहेर काढून नगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला. यासंदर्भात नगर तालुका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

दुसर्‍या घटनेत देहरे येथील अभिषेक मनोहर बडाख (16) याचा शेततळ्यातील पाण्यात बुडून बुधवारी दुपारी मृत्यू झाला. पोलिस पाटील अशोक खजिनदार यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.