आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन पोलिस निरीक्षकांच्या जिल्हा अंतर्गत तडकाफडकी बदल्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- तीन पोलिस निरीक्षकांच्या तडकाफडकी जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप उगले यांची विशेष शाखेत, तर विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक कैलास गावडे यांची शेवगाव पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली. पाथर्डी ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक आमले यांची नियंत्रण कक्षात बदली झाली आहे.

नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक धनंजय कमलाकर यांनी वार्षिक तपासणीदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली होती. एप्रिलनंतर मोठे फेरबदल करण्याचे संकेतही त्यांनी दिले होते.

एलसीबीचा कार्यभार सहायक पोलिस निरीक्षक चोभे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे, तर पाथर्डीचा कार्यभार परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी कलासागर यांच्याकडे पुढील तीन महिन्यांसाठी देण्यात आला आहे. कर्मचार्‍यांमधील अंतर्गत वादाचा फटका उगले यांना बसल्याची चर्चा आहे. गेल्या आठवड्यात व तत्पूर्वी एका वादग्रस्त कर्मचार्‍याने अधिकारी व कर्मचार्‍याशी हमरीतुमरी केली. मात्र, अजून त्याच्यावर कारवाई झालेली नाही.