आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या तीन जणांना अटक; 28 पर्यंत पोलिस कोठडी, सुपे पोलिसांची कामगिरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर- तालुक्यातील सुपे-वाळवणे रस्त्यावर बुधवारी (२२ नोव्हेंबर) व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या तिघांना सुपे पोलिसांनी अवघ्या तीन तासांत मुद्देमालासह अटक केली. या आरोपींना न्यायालयाने २८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली. 


विजयसिंग राठोड (वय ४६, विंचूर, ता. निफाड, जि. नाशिक) त्यांचा मित्र प्रवीण यांचा कोंबड्यांची पिल्ले विकत घेण्याचा व्यवसाय आहे. कोंबड्यांची पिल्ले देतो, पैसे घेऊन या असा बनाव आरोपींनी केला. राठोड हे प्रवीणसह त्यांची मालवाहतूक गाडी (एमएच-१५ जी ९९२६) घेऊन सुपे येथे आले. रात्री ८.३० वाजता पिल्ले देतो, असे सांगून आरोपी त्यांना वाळवणे रस्त्याला घेऊन गेला. आणखी दोन साथीदारांच्या मदतीने गाडी अडवून राठोड यांच्याकडील एक मोबाइल, त्यांचा मित्र प्रवीणकडील दोन मोबाइल २४ हजार ५०० रुपये रोख असा ऐवज बळजबरीने काढून घेतला. 


राठोड यांनी सुपे पोलिस ठाण्यात फिर्याद देऊन अारोपींचे वर्णन सांगितले. पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल मधुकर नगरे, बबन मखरे, बाबासाहेब अकोलकर, पोलिस नाईक अजय नगरे, शिवाजी कडूस, दत्तात्रय गावडे, भाऊसाहेब शिंदे, यशवंत ठोंबरे आदींच्या पथकाने आरोपींचा शोध घेत अभिजित हरीभाऊ गुंड (राहणार म्हसणे), शाहुल अशोक पवार (सुपे), अजित बाळासाहेब तरटे (म्हसणे) यांना म्हसणेफाटा येथे ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या मुद्देमालासह मोबाइल, बजाज कंपनीची पल्सर पोलिसांनी हस्तगत केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता २८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. 


रस्तालुटीतील तिघांना पोलिसांनी अटक केल्याने त्यांच्याकडून आणखी साथीदारांचा शोध लागणार असून, अन्य काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. तपास पाेलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बी. जे. पठाण करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...