आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरमध्ये जन्मल्या तीन ‘सरोगेट बेबी’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- ‘सरोगसी मदर’ ही संकल्पना आता सहज स्वीकारली जात आहे. यासाठी जवळची नातेवाईक किंवा मैत्रीण तयार होत आहे. नगरमध्ये तीन ‘सरोगेट बेबी’ जन्माला आल्या आहेत, अशी माहिती डौले हॉस्पिटलच्या डॉ. ज्योत्स्ना व पांडुरंग डौले यांनी दिली.

डॉ. डौले म्हणाले, दसर्‍याला डौले हॉस्पिटलला पंधरा वष्रे पूर्ण होत आहेत. हे जिल्ह्यातील पहिले टेस्ट ट्यूब बेबी सेंटर असून यात पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा प्रयोग झाला. स्पर्म एक्सट्रेक्शन व एंब्रियो फ्रिजिंगने बाळाचा जन्म झाला.

या सेंटरमध्ये आठ महिन्यांपूर्वी पहिल्या ‘सरोगेट बेबी’चा जन्म झाला, तर नुकतेच दोन ‘सरोगेट बेबी’चा जन्म झाला. कायद्याप्रमाणे ‘सरोगेट मदर’ला औषध, पाणी, उपचार, खाण्याचा व राहण्याचा खर्च दिला पाहिजे. ‘कर्मशिअल सरोगसी’ हे गालबोट सोडले, तर ही उपचारपद्धत सोयीची आहे, असे डॉ. डौले यांनी सांगितले.