आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ध्रुव’च्या तिघांची बाल वैज्ञानिक प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर- ध्रुव अकॅडमीतील तनिष्क मिलाणी, आेम गुंजाळ आणि स्वर्णिल वरघुडे या विद्यार्थ्यांची डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड झाली. शालेय विद्यार्थ्यांत वैज्ञानिक जाणिवा आणि ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी मुंबईच्या विज्ञान अध्यापक मंडळातर्फे सप्टेंबर महिन्यात या परीक्षा घेतल्या जातात. 


मुंबई विज्ञान अध्यापक मंडळाच्या वतीने घेतली जाणारी ही स्पर्धा स्कॉलरशीप स्पर्धेप्रमाणेच शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा मानली जाते. दरवर्षी सहावी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. 


‘ध्रुव’त सहावीत शिकणाऱ्या तनिष्क मिलाणी आणि आेम गुंजाळ यांची, तर नववीत शिकणाऱ्या स्वर्णिल वरघुडे याची या स्पर्धा परीक्षेतील प्रात्यक्षिकांसाठी निवड झाली. सहावीतील नित्याशा सचदेव, एैश्वर्या कल्हापुरे, प्रतीक्षा मालपाणी, सिध्दी नावंदर, आरव पलोड, प्रेम बाफना, वरद गाडेकर, भूमी शिंदे, श्रेणिक भंडारी, श्रावणी अभंग, इशिका कालडा, साई कोटकर, रौनक पटवा, ईशा फटांगरे, राशी कासट, वेद नावंदर, निशांत हासे, अभिषेक अवचार, नववीतील वेदीका नेहे, आर्यन पाटील, अबोली इंगोले, वेदांत कासार, देवयानी रोहकले मानव शर्मा या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले. शालेय उपक्रमासोबत अभ्यासपूरक परीक्षांत यश मिळवणाऱ्या या विद्यार्थ्यांचे ध्रुवचे अध्यक्ष संजय मालपाणी, प्राचार्या अर्चना घोरपडे यांनी अभिनंदन केले. 


विद्यार्थ्यांच्या विज्ञानवृत्तीला वाव 
डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत घोकंपट्टीला वाव नसतो. लेखी परीक्षेसोबत प्रकल्प, मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांच्या विज्ञानवृत्तीला वाव दिला जातो. या प्रकल्पातून विद्यार्थ्यांच्या वैविध्यपूर्ण कल्पना त्यांनी घेतलेल्या मेहनतीची कल्पना येते, असे ध्रुव अकॅडमीचे अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...