आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुलाच्या कठड्याला कार धडकून तीन युवक ठार, मृतांपैकी दोघे संगमनेरचे, तर एक जामखेडचा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर- नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर संगमनेरमधील बाह्यवळण मार्गावर सोमवारी मध्यरात्री अपघातात तीन महाविद्यालयीन युवक ठार झाले. मृतांपैकी दोघेजण संगमनेरचे, तर एक जामखेडचा आहे. महामार्गाचे चौपदरीकरण व पुलाचे बांधकाम सध्या सुरु आहे. दिशादर्शक फलक नसल्याने भरधाव वेगात असलेली कार थेट काम सुरु असलेल्या पुलावर जाऊन कठड्याला धडकल्याने हा अपघात झाला.

आदित्य श्रीगोपाल तिवारी (१८, देवाचा मळा, संगमनेर), प्रथमेश विष्णू भिंगारे (१९, इंदिरानगर, संगमनेर) आणि संकेत संजय बोरा (अरणगाव, जामखेड) अशी मृतांची नावे आहेत. हे तिघेही  झायलो कारमधून संगमनेरला येत होते. प्रवरापुलावर खांडगाव शिवारात हा अपघात झाला. हे युवक पुण्यात शिकत होते. शिवजयंतीसाठी ते संगमनेरला येत होते. अपघातात कारचा चक्काचूर झाला. 

पोलिस लगेच घटनास्थळी आले. त्यांनी जखमींना रुग्णालयात हलवले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. प्रथमेश आणि आदित्य यांच्यावर मंगळवारी दुपारी संगमनेरमध्ये, तर संकेतवर जामखेड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...