आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरफोडी करणारे अट्टल आरोपी जेरबंद, बारा बोअरची रायफल १२ काडतुसेही केली जप्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- चोरी घरफोड्या करणाऱ्या तीन अट्टल आरोपींच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले. आरोपींच्या ताब्यातून सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. यामध्ये सोन्याचे दागिने, बारा बोअरची एक रायफल १२ जिंवत काडतुसे यांचाही समावेश आहे. हा मुद्देमाल चोरलेला असल्याची कबुली त्यांनी दिली.

सुरेश ऊर्फ संतोष गायकवाड (बिंधान, ता. श्रीगोंदे), रंगनाथ तोरडे महिंद्रा काळे (दोघेही कामठी, ता. श्रीगोंदे) अशी आरोपींची नावे आहेत. रंगनाथ तोरडे हा टोळीचा मुख्य सूत्रधार असून आणखी काही साथीदार फरार आहेत. हे साथीदार सापडल्यास या टोळीकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला. हे तिघे कामठी येथे आल्याची गुन्हे शाखेला मिळाली होती. पोलिस निरीक्षक शशिराज पाटोळे यांच्या पथकातील उपनिरीक्षक राजकुमार हिंगोले, पोलिस नाईक दत्ता हिंगडे, कॉन्स्टेबल रवी सोनटक्के, दीपक शिंदे, संदीप पवार, विनोद मासाळकर, प्रमोद जाधव, विशाल दळवी, मच्छिंद्र बर्डे, सूरज वाबळे, चालक बाबासाहेब भोपळे यांनी ही कामगिरी केली.

आरोपींनी गुंगा आरडे यांचे बंद घर फोडून सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज चोरल्याची कबुली दिली आहे. त्यामध्ये सोन्याचे दागिने, बारा बोअर रायफल १२ जिवंत काडतुसे यांचा समावेश होता. याप्रकरणी आरडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन श्रीगोंदा पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अधिक तपासाकरिता आरोपींना श्रीगोंदे पोलिसांच्या हवाली करण्यात आले.