अहमदनगर- नेवासे तालुक्यातील माका येथे पहाटे चोरीची घटना घडली आहे. सोन्याचे दागिने आणि रोकड चोरट्यांनी पळविली. सोनई पोलिसांनी घटनास्थळी भेट देण्याऐवजी तुम्ही पोलिस ठाण्यात या, फिर्याद नोंदवू, असे चोरी झालेल्या घरातील व्यक्तींना सांगितले.
पोलिस फिरकलेच नाहीत
गावंदे कुटुंबीय रात्रभर पोलिसांना फोन करून थकले, पण पोलिस फिरकलेच नाहीत, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.