आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सायकल रॅलीद्वारे 'पर्यावरण पाणी वाचवा', स्वच्छतेचा संदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी - राजमाता जिजाऊ मल्टिपर्पज मेडिकल फाउंडेशन शिर्डी संचलित साईबाबा योग परिवाराच्या वतीने शिर्डीत सायकल रॅली काढून पर्यावरण वाचवा, पाणी वाचवा, स्वच्छता राखा, असा संदेश देण्यात आला.

येथील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले डाॅ. नचिकेत वर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली साईबाबा योगच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीची सुरुवात द्वारावती भक्तनिवास समोरून माजी विश्वस्त डाॅ. एकनाथ गोंदकर, डाॅ. पांडुरंग गुंजाळ यांच्या हस्ते करण्यात आली. या रॅलीत सहभागी झालेल्या साईयोग परिवाराच्या सदस्यांनी सायकलवर लावलेल्या फलकाद्वारे व्हा योगी, रहा निरोगी, स्वच्छता पाळा-आजार टाळा, व्यसनमुक्ती- रोगाला मुक्ती, ओला-सुका कचरा वेगळा करा, प्लास्टिकचा वापर टाळा-पर्यावरण वाचवा, कापडी पिशव्या वापरा, सायकल चालवा आरोग्य संभाळा असा संदेश दिला.

पाच किमी अंतराची ही रॅली काढण्यात आली. साईबाबा द्वारकामाई-चावडीसमोर रॅलीतील सर्व सदस्यांनी नामस्मरण करत प्लास्टिक वापरण्याची शपथ घेतली. रॅलीत डाॅ. नचिकेत वर्पे, ज्ञानेश्वर लांबोळे, दिलीप वाकचौरे, मनोज वाघ, संदीप सोनवणे, रवी महाले, सचिन औताडे, सोपान बारहाते, शिखरचंद कासलीवाल, प्रदीप बाफना, बाबा काळे, भूषण लोढा, अनिल शेळके, राजेंद्र गगे, डाॅ. धनंजय जगताप, अनिल कटके, संतोष दुसाने, हरिश गवांदे, सोमनाथ लोळगे, संजय जाधव, गोकूळ ओस्तवाल, नितीन शिंदे, सुधाकर शिंदे, हरिराम रहाणे, सुधाकर शिंदे, नंदू कुलकर्णी, प्रमोद ओस्तवाल, राजेंद्र चौधरी, अभिमन्यू ढमढेरे, राम आहेर आदी सहभागी होते.
बातम्या आणखी आहेत...