आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाघोबांच्या छायाचित्रांचे उद्यापासून "सुरवि'त प्रदर्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जागतिक व्याघ्रदिनाचे औचित्य साधून चितळे रस्त्यावरील जिल्हा वाचनालयाजवळील सुरवि आर्ट गॅलरीत वाघोबांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. शेवगाव येथील हौशी छायाचित्रकार ज्ञानेश्वर कातकडे यांनी देशभरातील जंगलांमध्ये भटकंती करून काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन २९ जुलैला सुरू होत आहे.
वाघाबद्दल प्रत्येकालाच आकर्षण असते. कुतूहल भिती अशा दोन्ही बाबी या प्राण्याबद्दल आढळतात. जागतिक व्याघ्र दिनानिमित्त नगरकरांना वाघोबाचे जवळून दर्शन घेता यावे, यासाठी कातकडे यांनी काढलेल्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संचालक विजय जुंदेरे यांनी दिली. सुरवि आर्ट गॅलरी, मुक्त वृत्तछायाचित्रकार संघटना रोटरी सेंट्रलतर्फे होणाऱ्या या प्रदर्शनाचे उद््घाटन बुधवारी सकाळी ११ वाजता जिल्हा वन अधिकारी जी. डी. वळसे यांच्या हस्ते होईल. वन्यजीव छायाचित्रकार राहुल बेलसरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
बापूसाहेब भोसले, महेश फलके, अरुण अभंग, सुधीर म्हस्के, डॉ. सुधाकर कुऱ्हाडे, संजय दळवी, उमेश रेखे, धीरज मुनोत, सुरेश भुसा, राजाभाऊ मुळे यावेळी उपस्थित असतील. प्रदर्शन २९ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. सकाळी १० ते रात्री दरम्यान ते विनामूल्य खुले असेल, अशी माहिती सुरेश मैड यांनी दिली.