आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टिळकांच्या गणेशोत्सवाला "जनजागृती'कडून उजाळा, देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- गणेशोत्सवाचेस्वरूप दरवर्षी बदलत आहे. हा उत्सव सुरू करणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या काळातील गणेशोत्सवाचा सर्वांनाच विसर पडला. टिळकांच्या काळातील गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा केला जात होता, त्याचे महत्त्व काय होते, तसेच आजचा गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा होत आहे, याचे वास्तव चित्र स्वस्तिक चौकातील जनजागृती सार्वजनिक मंडळाने देखाव्याद्वारे मांडले आहे. मंडळाने सादर केलेला "गणेशोत्सव पूर्वीचा आजचा' हा देखावा आजच्या पिढीच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे.
स्वस्तिक चौकातील जनजागृती सार्वजनिक मंडळाचे संस्थापक नगरसेवक अिनल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाने यावर्षी "गणेशोत्सव पूर्वीचा आजचा' हा देखावा सादर केला. शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ कोरगांवकर यांच्या हस्ते बुधवारी देखावा खुला करण्यात आला. यावेळी शिवसेना उपनेते अनिल राठोड, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, माजी महापौर शीला शिंदे, भगवान फुलसौंदर, शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक अनिल शिंदे, अनिल बोरूडे, सचिन जाधव, उमेश कवडे, योगीराज गाडे, सुरेश तिवारी, दिगंबर ढवण आदी उपस्थित होते.

गुलालाची उधळण, बैलगाडीमध्ये बाप्पांची मिरवणूक, बैलांच्या अंगावरील झुल, मिरवणूकीतील पारंपारिक वाद्य, गांधी टोपी घालून मिरवणुकीत सहभागी झालेले नागरिक, असे टिळकांच्या काळातील गणेशोत्सवाचे चलचित्र जनजागृती मंडळाने उभे केले. दुसऱ्या बाजूला आजच्या गणेशोत्सवाचे बिभत्स चित्र देखाव्यातून मांडले आहे. आजच्या गणेशोत्सवातील बिभत्स गाणी, स्टेजवर नाजणाऱ्या महिला असे चित्र या देखाव्यातून मांडले आहे.